Join us
Daily Top 2Weekly Top 5

राज कुंद्राच्या एक्स वाईफचं होतं घरातल्याच पुरुषासोबत अफेअर? रंगेहात पकडल्यानंतर घेतला घटस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2023 14:59 IST

Raj kundra: शिल्पा शेट्टी ही राज कुंद्राची दुसरी पत्नी असल्याचं फार कमी जणांना ठावूक आहे. राजचं पहिलं लग्न कवितासोबत झालं होतं.

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती आणि उद्योजक राज कुंद्रा ( raj kundra) गेल्या काही काळापासून सातत्याने चर्चेत येत आहे. पॉर्नोग्राफी केसमध्ये राज अडकल्यापासून तो समाज माध्यमांसमोर येण्याचं टाळतो. इतकंच नाही तर कॅमेरासमोर आल्यानंतरही तो चेहरा मास्कने झाकतो. राज कुंद्रा त्याच्या प्रोफेशनल लाइफपेक्षा पर्सनल लाइफमुळे बऱ्याचदा चर्चेत येत असतो. यावेळी त्याच्या पहिल्या लग्नाची चर्चा रंगली आहे.  राजने त्याच्या पत्नीवर अनेक गंभीर आरोप करत तिला घटस्फोट दिला होता.

शिल्पा शेट्टी ही राज कुंद्राची दुसरी पत्नी असल्याचं फार कमी जणांना ठावूक आहे. राजचं पहिलं लग्न कवितासोबत झालं होतं. इतकंच नाही तर त्यांना एक मुलगीदेखील आहे. कवितापासून घटस्फोट घेतल्यानंतर एका मुलाखतीमध्ये त्याने कवितापासून विभक्त होण्यामागचं कारण सांगितलं.

'' मी माझ्या पत्नी, आई-वडील, बहीण आणि तिच्या नवऱ्यासोबत अमेरिकेमध्ये राहत होतो. माझी पत्नी माझ्या मेहुण्यासोबत म्हणजे बहिणीच्या नवऱ्यासोबत जास्त वेळ घालवायची. ज्यावेळी मी कामानिमित्त देशाच्या बाहेर जायचो त्यावेळी ती जास्तकरुन त्याच्याच सोबत असायची. या गोष्टीची कल्पना केवळ माझ्या घरातले नाही तर ड्रायव्हरलादेखील होती. पण, त्याच्या बोलण्यावर मी कधीच विश्वास ठेवला नाही", असं राज म्हणाला.

पुढे तो म्हणतो, "कविता कायम माझ्या मेहुण्यासोबत बाहेर फिरायला जायची. दोघं एकाच रुममध्ये गप्पा मारत बसायचे. त्यामुळे माझ्या बहिणीलाही संशय आला होता. एकाच छताखाली राहून जे काही सुरु होतं ते पाहणं शक्य नव्हतं. त्यामुळे माझी बहीण तिच्या पतीसोबत भारतात आली. ते भारतात आल्यानंतर कविता प्रेग्नंट असल्याचं लक्षात आलं. बाळाला जन्म दिल्यानंतर तिचं वागणं पुन्हा बदललं. याच काळात माझ्या बहिणीने मला फोन करुन तिला एक मोबाईल सापडल्याचं सांगितलं. या मोबाईलमध्ये काही मेसेज होते. त्यानंतर मी शोध घेतल्यावर लक्षात आलं की कविताने सुद्धा तिच्या कपाटात एक मोबाईल लपवला होता. बाथरुममध्ये जाऊन ते एकमेकांशी बोलायचे. त्यानंतर मग मी कायदेशीर पद्धतीने विभक्त होण्याचा निर्णय घेतला." दरम्यान, कविताला घटस्फोट दिल्यानंतर राजने २००९ मध्ये शिल्पा शेट्टीसोबत लग्न केलं. या जोडीला दोन मुलंदेखील आहेत.    

टॅग्स :राज कुंद्राशिल्पा शेट्टीबॉलिवूडसेलिब्रिटी