Join us
Daily Top 2Weekly Top 5

Shikara Trailer : अंगावर काटे आणणारा 'शिकारा'चा ट्रेलर एकदा पाहाच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2020 15:39 IST

Shikara Movie Trailer : ट्रेलर लाँच होताच तो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतो आहे. जाणून घ्या या मागचे कारण.

निर्माता विधु विनोद चोप्रा यांचा आगामी सिनेमा 'शिकारा-अ-लव लेटर फ्रॉम कश्मीरी पंडित'चा ट्रेलर रिलीज झाला आहे. सिनेमाच्या नावावरुन हे स्पष्ट होतेय की सिनेमा काश्मीर पंडितांवर आधारित आहे. या सिनेमाची वाट प्रेक्षक मोठ्या आतुरतेने करत होते याची प्रचिती सिनेमाचा ट्रेलर लाँच झाल्यावर आली. ट्रेलर लाँच होताच तो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतो आहे. 

ट्रेलरची सुरुवात एक प्रेमी जोडप्यांच्या शेरों शायरीने होते. तेव्हा अचानक बाहेर गोंधळ होतो आणि लोक आपल्या घरातून बाहेर रस्त्यावर येतात. ट्रेलरमध्ये काही लोकांच्या घराला आग लावताना दिसतेय आणि कश्मीर पंडितांना इथून जावं लागले असे बोलताना काही लोक दिसतायेत. आझादीच्या नारे ऐकून कश्मीरी पंडित घाबरुन जातात. सिनेमाचा ट्रेलर खूप भावूक आणि अंगावर शहारे आणणारा आहे.     

 सिनेमाची कथा 1990 साली जेव्हा काश्मीरमधून एक समुदायला बेघर करण्यात आले होते. 30 वर्षे उलटून गेल्यावर सुद्धा अजून ते आपल्या घरी परतले नाहीत. त्यांची व्यथा या सिनेमातून मांडण्यात आली आहे. विधु विनोद चोप्रा यांची शिकारा-अ-लव लेटर फ्रॉम कश्मीरी पंडित' 7 फेब्रुवारी 2020मध्ये रिलीज होणार आहे.  

टॅग्स :शिकारा