Join us
Daily Top 2Weekly Top 5

'शेरनी है तू.. सायना नेहवाल है तेरा नाम',परिणीती चोप्राचा चित्रपट सायनाचा ट्रेलर झाला रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2021 17:43 IST

परिणीती चोप्राचा आगामी चित्रपट सायनाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे.

परिणीती चोप्राचा आगामी चित्रपट सायनाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. काही वेळापूर्वी रिलीज झालेल्या या ट्रेलरला चाहत्यांची पसंती मिळते आहे आणि लाइक्स आणि कमेंट्सच्या माध्यमातून आपले प्रेम व्यक्त करत आहेत. काही वेळातच या ट्रेलरला २५ हजारांहून जास्त लाइक्स मिळाले आहेत. २ मिनिट ४८ सेकंदाच्या ट्रेलरमध्ये फक्त चांगलेच डायलॉग्ज नाही तर मनाला भावतील असे कित्येक सीनदेखील पहायला मिळत आहेत. 

'रास्ते पर चलना एक बात है बेटा और रास्ता बनाना दूसरी बात, तू न बेटा वो दूसरी बात करने की सोच', याच संवादाने सुरूवात होते सायनाच्या ट्रेलरला. यानंतर छोट्या सायनापासून विजेती बनण्यापर्यंतचा प्रवासादरम्यानचे अनेक क्षण ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहेत. या ट्रेलरमधील बरेच संवाद प्रेरणादायी आहेत. ज्यातील एका संवादात सायनाची आई तिला बोलते की, 'शेरनी है तू.. सायना नेहवाल है तेरा नाम'.

सायना चित्रपट २६ मार्चला रिलीज होणार आहे. या चित्रपटाची चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहे. या चित्रपटात सायना नेहवालची भूमिका परिणीती चोप्रा साकारताना दिसणार आहे.

यापूर्वी ही भूमिका श्रद्धा कपूर करणार होती. मात्र काही कारणास्तव श्रद्धा कपूर चित्रपटातून बाहेर पडली आणि तिच्या जागी परिणीती चोप्राची वर्णी लागली. परिणीती चोप्राचा नुकताच नेटफ्लिक्स 'द गर्ल ऑन द ट्रेन' चित्रपटात झळकली आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे.

टॅग्स :सायना नेहवालपरिणीती चोप्राश्रद्धा कपूर