Join us
Daily Top 2Weekly Top 5

भन्नाटच, शर्लीन चोप्राने केला चीनी वस्तूंचा बहिष्कार, 'मेड इन इंडिया' गाण्यावर नाचताना दिसली अभिनेत्री 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2020 12:21 IST

भारतीयांनी चिनी अ‍ॅप्स, मोबाईल आणि इतर सर्व गोष्टी वापरणं बंद करण्यास सुरुवात केल्याचं दिसून येतंय. चीनी वस्तूंचा बहिष्काराचे आवाहन करण्यासाठी सेलिब्रेटी मंडळीही मैदानात उतरले आहेत.

सध्या चीनी वस्तू विकत न घेता सारेच भारतीय वस्तू खरेदी करण्यावर भर देत आहे.  देशात 15 दिवसांपासून लडाखच्या सीमेवर भारत-चीनमध्ये संघर्ष सुरू आहे. या संघर्षात भारताचे 20 जवान शहीद झाले. तर चीनच्या 43 सैनिकांना ठार करण्यात आलं आहे. तेव्हापासून देशभरातून चीनवर बहिष्कार घालण्याची मागणी होत आहे. तर, भारतीयांनी चिनी अ‍ॅप्स, मोबाईल आणि इतर सर्व गोष्टी वापरणं बंद करण्यास सुरुवात केल्याचं दिसून येतंय. चीनी वस्तूंचा बहिष्काराचे आवाहन करण्यासाठी सेलिब्रेटी मंडळीही मैदानात उतरले आहेत. वेगवेगळ्या पद्धतीने याविषयी सर्वसामान्यांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. यात शर्लिन चोप्रानेही पुढाकार घेत एक गाण्याचा व्हिडीओ प्रदर्शित केला आहे.  

शर्लिन चोप्रा नेहमीच एक धाडसी आणि स्पष्ट बोलणारी अभिनेत्री समजली जाते.तिने कास्टिंग काउचवरील आपला वैयक्तिक अनुभव कोणालाही न घाबरता सर्वांसमोर सांगितला होता. सुशांतसिंग राजपूत सुसाईड केस बद्दल बोलतानासुद्धा ती घाबरली नाय. शर्लिन चोप्रा मागे "कतार" हा म्युझिक व्हिडीओमुळेही चर्चेत होती. लाखो लोकांनी तिचा हा व्हिडीओ पाहिला होता. तिच्या या व्हिडीओला तुफान पसंती मिळाली होती. 

पुन्हा एकदा शर्लिन आपल्या नवीन व्हिडीओसह सज्ज झाली आहे. 'मेड इन इंडिया' ह्या गाण्यावर ठेका धरत चीनी वस्तूंचा बहिष्कार करा असा संदेश यातून तिने दिला आहे. 

टॅग्स :शर्लिन चोप्रा