Join us
Daily Top 2Weekly Top 5

ग्लॅमर इंडस्ट्रीत काय होतो ‘डिनर’चा अर्थ, शर्लिन चोप्राने दिले उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2020 09:58 IST

शर्लिनने सांगितले, करिअरच्या सुरुवातीचे अनुभव

ठळक मुद्देशर्लिन चोप्राने अलीकडे रामगोपाल वर्मा यांच्यावर खळबळजनक आरोप केले होते. 

फिल्म इंडस्ट्रीत ग्लॅमर, पैसा, प्रसिद्धी असे सगळे काही असले तरी आणखीही काही गोष्टी आहेत. कास्टिंग काऊच यापैकीच एक. अनेक कलाकार यावर बोलले आहेत. आता बॉलिवूडमध्ये आपल्या बोल्ड अंदाजासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री शर्लिन चोप्रा हिनेही इंडस्ट्रीतील कास्टिंग काऊचबद्दल मोठा खुलासा केला आहे. इंडस्ट्रीतील ‘डिनर’चा अर्थ तिने सांगितला आहे. शिवाय करिअरच्या सुरुवातीला काय काय सहन करावे लागले, त्याचाही खुलासा केला आहे.

एका पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत ती यावर बोलली. तिने सांगितले, करिअरच्या सुरुवातीला इंडस्ट्रीमध्ये मला कुणीच ओळखत नव्हते. मी निर्मात्यांकडे काम मागायला जायचे. ते माझ्यातील प्रतिभा पाहतील, अशी माझी अपेक्षा होती. मी पोर्टफोलिया घेऊन त्यांच्याकडे जायचे आणि  यावर ओके, ठीक आहे. आपण डिनरवर भेटू, असे मला सांगायचे. डिनरसाठी किती वाजता येऊ, असे विचारल्यावर रात्री 11 वा 12 वाजता असे उत्तर मला मिळायचे. त्या लोकांसाठी या डिनरचा अर्थ होता कॉम्प्रमाइज. असे माझ्यासोबत चार ते पाचवेळा झाले़. तेव्हा कुठे त्यांच्या डिनरचा खरा अर्थ मला कळला. फिल्म इंडस्ट्रीत डिनरचा एकच अर्थ आहे, तो म्हणजे, मेरे पास आओ बेबी.

 निर्मात्यांचा हेतू लक्षात आल्यावर मी त्यांना नकार द्यायला लागले. यानंतर मला डिनर करायचेच नाही, असे मी ठरवले. यानंतर जो कुणी या कोड वर्डमध्ये माझ्याशी बोलायचे, त्यांना मी स्पष्टपणे सांगू लागली. मी डिनर करत नाही, मी डायटिंगवर आहे. तुम्ही ब्रेकफास्टसाठी बोलवा, लंचसाठी बोलवा, असे मी म्हणायचे. यावर समोरच्या व्यक्तिकडे कुठलेच उत्तर नसायचे.

शर्लिन चोप्राने अलीकडे रामगोपाल वर्मा यांच्यावर खळबळजनक आरोप केले होते. रामगोपाल वर्मा यांनी मला अ‍ॅडल्ट चित्रपटात काम करण्याची आॅफर दिली होती आणि अश्लिल मॅसेज पाठवले होते, असे तिने म्हटले होते.

टॅग्स :शर्लिन चोप्रा