बॉलिवूड अभिनेता राहुल बोस याने चंदीगडमधील एका फाईव्ह स्टार हॉटेलात दोन केळी ऑर्डर केली होती आणि हॉटेलने चक्क 442 रूपयांचे बिल फाडले होते. राहुलने सोशल मीडियावर हे बिल शेअर केल्यानंतर वेगळ्याच चर्चेला तोंड फुटले होते. आता अगदी असाच किस्सा म्युझिक कंपोझर शेखर रावजियानीसोबत घडला. बॉलिवूडमधील अनेक सुपरहिट चित्रपटांना संगीत देणारी विशाल-शेखर यांची जोडी साऱ्यांनाच ठावूक आहे. सध्या शेखर रावजियानीची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. होय, गुरुवारी एका फाईव्ह स्टार हॉटेलात मुक्कामाला असताना समोर आलेले बिल पाहून त्याला धक्काच बसला. होय, शेखर एका पंचतारांकित हॉटेलात मुक्कामाला होता. यादरम्यान त्याने तीन उकडलेली अंडी ( पांढरा भाग) मागवली आणि यासाठी त्याला तब्बल 1672 रूपयांचे बिल आकारण्यात आले.
पंचतारांकित हॉटेलात तीन अंड्यांसाठी शेखरने मोजले इतके रूपये, बिल पाहून बसेल धक्का
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2019 11:51 IST
राहुल बोस याने एका फाईव्ह स्टार हॉटेलात दोन केळी ऑर्डर केली होती आणि हॉटेलने चक्क 442 रूपयांचे बिल फाडले होते. आता अगदी असाच किस्सा म्युझिक कंपोझर शेखर रावजियानीसोबत घडला.
पंचतारांकित हॉटेलात तीन अंड्यांसाठी शेखरने मोजले इतके रूपये, बिल पाहून बसेल धक्का
ठळक मुद्देयापूर्वी राहुल बोसलाही असाच अनुभव आला होता. राहुलनेही बिलाचा फोटो शेअर केला होता.