Join us
Daily Top 2Weekly Top 5

'नजर २'मध्ये या अभिनेत्याची एन्ट्री, रोलबाबत केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 29, 2020 12:54 IST

या अभिनेत्याला 'नजर २'मधील भूमिकेसाठी करावी लागली खूप तयारी

स्टार प्लस वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'नजर'ला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर या मालिकेचा सीक्वल आला. या सीक्वललाही प्रेक्षकांचा चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे. आता या मालिकेत छोट्या पडद्यावरील अभिनेता शेजान मोहम्मदची एन्ट्री झाली आहे. तो या मालिकेत अप्पूची भूमिका साकारताना दिसणार आहे. 

शेजानने आपल्या मालिकेतील शूटिंगच्या अनुभवाबद्दल सांगितले की,' मी अप्पू नावाची भूमिका साकारतो आहे. जो मनाने ५ वर्षाचा आहे. तशीच भूमिका मी एक थी राणी या मालिकेत केली होती. त्यामुळे अप्पूची भूमिका मी चांगल्यारित्या प्रेक्षकांसमोर सादर करण्याची माझ्यावरची जबाबदारी आणखीन वाढली आहे.' 

तो पुढे म्हणाला की, 'अप्पूच्या भूमिकेसाठी मला आवाजात बदल करावा लागला. प्रेक्षकांनाही ही भूमिका आवडेल, अशी मला आशा आहे.'

शेजानने खूप कमी वेळात टेलिव्हिजन इंडस्ट्रीत आपले स्थान बनविले आहे. त्याने पृथ्वी वल्लभ, जोधा अकबर, चंद्र नंदिनी, सिलसिला प्यार का, एक थी रानी एक था रावण आणि तारा फ्रॉम सातारा या मालिकेत काम केले आहे आणि आता नजर २ या मालिकेतून तो पुन्हा एकदा रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविण्यासाठी सज्ज झाला आहे.

टॅग्स :नजरस्टार प्लस