Join us

ही प्रसिद्ध अभिनेत्री आहे आशा काळेंची भाची, तिचं आहे लक्ष्मीकांत बेर्डेंशी खास कनेक्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2024 10:21 IST

Asha Kale : ८० च्या दशकांतील मराठी चित्रपटांमध्ये आशा काळे यांनी आपल्या अभियनानं मराठी प्रेक्षकांमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली होती. फार कमी जणांना माहित आहे की, आशा काळेंची भाचीदेखील मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

मराठी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयानं गेल्या चार दशकांहून अधिक काळ प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे (Asha Kale) यांच्या अभिनयाचे हजारो चाहते आहेत. ८० च्या दशकांतील मराठी चित्रपटांमध्ये आशा काळे यांनी आपल्या अभियनानं मराठी प्रेक्षकांमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली होती. फार कमी जणांना माहित आहे की, आशा काळेंची भाचीदेखील मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ही अभिनेत्री म्हणजे प्रिया बेर्डे (Priya Berde). 

एका कार्यक्रमात प्रिया बेर्डे यांनी याबद्दल सांगितले होते. त्या म्हणाल्या होत्या की, ‘आशा काळे ही माझी मावशी आहे’. हे सांगताना ‘ प्रिया बेर्डे म्हणाल्या की, ‘मी लहान होते तेव्हा आशा मावशीसोबत एका चित्रपटात काम करण्याची संधी मला मिळाली होती. मी तिला आशा मावशीच म्हणते. ती माझ्या आईची बहीण आहे. लता काळे माझी आई आणि आशा काळे या दोघींच्या अभिनयाचा प्रभाव माझ्या बालमनावर पडला होता’. असे म्हणत प्रिया बेर्डेंनी आशा काळे यांचे कौतुक केले. 

प्रिया बेर्डे यांच्या आई लता अरुण कर्नाटकी. लक्ष्याच्या एक गाडी बाकी अनाडी ह्या चित्रपटात प्रिया यांच्या आईने लक्ष्याच्या आईची भूमिका साकारली होती. या चित्रपटात प्रिया यांनी देखील प्रमुख भूमिका पार पडली होती. पूर्वाश्रमीच्या त्या लता काळे म्हणून ओळखल्या जात. प्रिया बेर्डे यांचे आजोबा वासुदेव कर्नाटकी, वडील अरुण कर्नाटकी, चुलत आत्या बेबी नंदा, मामी माया जाधव, मामा शहाजी काळे, व्ही शांताराम, भालजी पेंढारकर अशा इंडस्ट्रीतील मोठ्या व्यक्तींसोबत त्यांचे नातेसंबंध आहेत.

टॅग्स :लक्ष्मीकांत बेर्डेप्रिया बेर्डे