Join us
Daily Top 2Weekly Top 5

मी अपघाताने अभिनेता झालो शशांक खेतानने पहिल्यांदाच शेअर केली खास गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2019 10:42 IST

दिग्दर्शित केलेले 'हम्प्टी शर्मा की दुल्हनिया', 'बद्रिनाथ की दुल्हनिया' सिनेमांना रसिकांची तुफान पसंती मिळाली, बॉक्स ऑफिसवरही या सिनेमाला भरघोस यश मिळालं त्यामुळे शशांक खेतान आणि सुपरहिट सिनेमा असे समीकरणच जणू बनले आहे.  

नामवंत दिग्दर्शकाच्या यादीत शशांक खेतानाचे नाव सामिल झाले आहे. त्याने दिग्दर्शित केलेले 'हम्प्टी शर्मा की दुल्हनिया', 'बद्रिनाथ की दुल्हनिया' सिनेमांना रसिकांची तुफान पसंती मिळाली, बॉक्स ऑफिसवरही या सिनेमाला भरघोस यश मिळालं त्यामुळे शशांक खेतान आणि सुपरहिट सिनेमा असे समीकरणच जणू बनले आहे.  त्याने दिग्दर्शित केलेल्या सिनेमांना रसिकही आपसुकच चित्रपटगृहाकडे वळतात. नुकताच 'डान्स दीवाने'च्या सेटवर शशांक खेतानने हजेरी लावली होती. यावेळी त्याने अनेक गोष्टी रसिकांसह शेअर केल्या. 

शशांक खेतान आता अभिनेताही बनला आहे. यावर त्याने सांगितले की, अपघाताने अभिनेता बनलो आहे. आणि त्यात रेमो डिसूझाचा वाटा आहे. 'एबीसीडी 2' च्या सेटवर तो रेमोला भेटण्यासाठी गेला तेव्हा. अगदी काही क्षणातच रेमोने स्टायलिस्टला सूचना दिल्या आणि शशांकच्या अंगावर एक जॅकेट व हॅट चढवण्यास सांगितली आणि त्याला  कॅमेऱ्या समोर जाण्यास सांगितले. रेमोच्या सांगण्यानुसार शशांकनेही ऑडीशन दिले आणि अगदी रेमोला हवा तसा अभिनय शशांकनेही केला. सिनेमात शशांकची अभिनेता म्हणून वर्णी लागली. यावरून एक दिग्दर्शक चांगला अभिनेताही बनण्याचा शशांकचा मानस आहे. 

टॅग्स :रेमो डिसुझा