Join us
Daily Top 2Weekly Top 5

सैफच्या बालपणी आई शर्मिला सतत कामामुळे बाहेर असायची, दुस-या आईने केला त्याचा सांभाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2020 16:38 IST

शर्मिला यांनी सांगितले होते की, जेव्हा सैफने त्याच्या करिअर सुरू करण्याकडे वाटचाल सुरू केली होती. तेव्हा त्याच्या प्रत्येक क्षणी मी त्याच्या बरोबर होती.

बॉलिवूडचा नवाब सैफअली खानेच  कित्येक फॅन्स त्याच्यावर अक्षरक्षः जीव ओवाळून टाकतात. त्यामुळे आपल्या या लाडक्या स्टारविषयी जाणून घेण्याची प्रत्येकालाच इच्छा असते. त्याच्याविषयीच्या विविध बारीकसारीक गोष्टींमध्ये रसिकांना रस असतो. त्यातच या लाडक्या स्टारचे जुने फोटो पाहायला मिळाले तर क्या बात. सध्या सैफचे बालपणीचे असेच काही जुने फोटो व्हायरल होत आहेत. यात एक जुना फोटो समोर आला आहे. या फोटोने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. 

कोरोनाचा कहर अजूनही थांबला नाहीय. संपूर्ण जगात धोकादायक विषाणूने थैमान घातले आहे. कोरोनामुळे लॉकडाऊनही पाळण्यात आला. अनेक महिने लोक घरातच बंदिस्त होते. हळुहळु कोरोना कमी होतोय हे पाहाताच जनजीवनही सुरळीत होत आहे. त्यामुळे सिनेमा मालिकांचेही शुटिंग सुरू झाले आहे. अशातच काही सेलिब्रेटींकडे काम नसल्यामुळे व्हॅकेशन एन्जॉय करत आहेत. तर काही आपल्या कामात बिझी झाले आहेत. 

सैफ अली खानही सध्या त्याच्या आगामी सिनेमाचे शूटिंग करण्यात व्यस्त आहे. धरमशाला येथे तो सध्या त्याच्या आगामी सिनेमाचे शूटिंग करत आहे.  दरम्यान सैफ अली खानची आई शर्मिला टागोर यांचा जुना व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत त्यांनी सैफच्या जन्मानंतर त्यांनी काम करणे बंद केले नव्हते.

त्यावेळी त्या सतत कामात बिझी असायच्या. सैफला जेव्हा खरच आईची गरज होती तेव्हा त्या वेळ देऊ शकल्या नसल्याची खंत या व्हिडीओत बोलून दाखवली होती. पाहिजे तसा सैफला त्या वेळ देऊ शकल्या नाही. लहानपणी सैफला शर्मिला यांच्या दुस-या आईनेच जास्त सांभाळले. आईप्रमाणेच त्याची काळजी घेतल्याचे सांगितले.

सैफचे आई शर्मिलावर जीवापाड प्रेम आहे. शर्मिला यांचे देखील आपल्या मुलावर खूप प्रेम आहे. शर्मिलाने यांनी स्वत:हा कबूल केले होते की, जितका वेळ तिने आपल्या मुली सोहा अली खान दिला तितका वेळा सैफला दिला नाही. 2017 मध्ये, सैफचा लहानपणीचा फोटो समोर आला होता. या फोटोत सैफ बहीण सोहा अली खान आणि आई शर्मिलासह दिसत आहे. हा बालपणातला फोटो एरव्ही कधीच कोणी पाहिला नसेल. पहिल्यांदाच ब्लॅक अँड व्हाईट जुन्या जमान्यातला सैफचा बालपणीचा फोटो पाहून चाहत्यांनीही लाईक्स कमेंट्चा वर्षाव केला होता. 

शर्मिला यांनी सांगितले होते की, जेव्हा सैफने त्याच्या करिअर सुरू करण्याकडे वाटचाल सुरू केली होती. तेव्हा त्याच्या प्रत्येक क्षणी मी त्याच्या बरोबर होती. त्याच्या या स्ट्रगलच्या काळात त्याला कुठेही एकटे सोडायचे नव्हते. सदैव मी त्याच्या पाठीशी उभी राहिली. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार नवाब पतौडीशी लग्नानंतर सैफच्या आईने आपला धर्म बदलला. लग्नानंतर आयशा सुल्तान म्हणून नावात बदल केला होता.

टॅग्स :शर्मिला टागोरसैफ अली खान