Join us
Daily Top 2Weekly Top 5

क्रिकेटर मंसूर खान यांच्याशी विवाह केल्याने शर्मिला टागोर यांना मिळालेली जीवे मारण्याची धमकी, अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2023 15:47 IST

शर्मिला टागोर यांनी १९६८मध्ये क्रिकेटर मंसूर अली खान यांच्याबरोबर लग्न करत नवीन आयुष्याला सुरुवात केली होती. पण, आंतरधर्मीय विवाह केल्यामुळे त्यांना समाजाच्या रोषाला सामोरं जावं लागलं होतं. 

अभिनय आणि सौंदर्याने ६०-७०चं दशक गाजवणारी सुप्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे शर्मिला टागोर. 'वक्त', 'अनुपमा', 'सफर', 'दाग', 'अमर प्रेम', 'चुपके चुपके', 'नमकीन' अशा सुपरहिट चित्रपटांत काम करुन त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. शर्मिला टागोर यांनी १९६८मध्ये क्रिकेटर मंसूर अली खान यांच्याबरोबर लग्न करत नवीन आयुष्याला सुरुवात केली होती. पण, आंतरधर्मीय विवाह केल्यामुळे त्यांना समाजाच्या रोषाला सामोरं जावं लागलं होतं. 

शर्मिला टागोर यांनी नुकतंच ट्विंकल खन्नाला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी अनेक खुलासे केले.  त्या म्हणाल्या, "माझ्या कुटुंबात माझे काका, माझी भावंडं सगळ्यांचीच लग्न बंगाली समाजातच झाली होती. आणि मंसूर अली खान यांच्या कुटुंबात देखील सगळ्यांनी मुस्लीम जोडीदाराशीच लग्नगाठ बांधली होती. पण, आम्ही आंतरधर्मीय लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हा मी काम करत होते. आणि ते क्रिकेट खेळायचे. त्यामुळे आम्हाला एकमेकांच्या कुटुंबाबद्दल काहीच माहीत नव्हतं."

उर्फी जावेदने गुपचूप उरकला साखरपुडा? मिस्ट्री मॅनबरोबरचे फोटो झाले व्हायरल

धर्माने मुस्लीम असलेल्या मंसूर अली खान यांच्याबरोबर लग्न करणार असल्यामुळे शर्मिला टागोर यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. या मुलाखतीत त्यांनी याबाबत खुलासा केला. गोळ्या घालून कुटुंबीयांची हत्या करण्यात येईल, अशी धमकीही त्यांना मिळाली होती. ऐनवेळी लग्नाचं ठिकाणही त्यांना बदलावं लागलं होतं. त्यांचं लग्न फोर्ट विल्यम, कोलकाता येथे होणार होतं. परंतु, नंतर हे ठिकाण बदलण्यात आलं होतं. 

प्रभासला भेटण्याच्या आनंदात चाहतीने अभिनेत्याच्या गालावरच मारली चापट, पुढे त्याने काय केलं पाहा

शर्मिला टागोर यांचे पती मंसूर अली खान हे भारतीय क्रिकेटर होते. क्रिकेटविश्वात त्यांचं मोठं नाव होतं. त्यांना सैफ अली खान, साबा अली खान आणि सोहा खान ही तीन मुले आहेत.  

टॅग्स :शर्मिला टागोरसेलिब्रिटीसैफ अली खान