Sharayu Sonawane Dog Rescue Video : सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण वेगवेगळ्या प्रकारे प्लास्टिकचा वापर करत असतो. प्लास्टिक कचरा अनेक शहरेच नाही तर आता ग्रामीण भाग व्यापत चालला आहे. पर्यावरण, पाणी, जमीन यासाठी धोकादायक आहेच, शिवाय प्राणी, पक्षी यांच्यासाठी जीवघेणे ठरू लागले आहे. नुकतंच पुण्यात कुणीतरी उघड्यावर फेकलेल्या प्लास्टिकच्या बरणीत एका भटक्या श्वानाचे तोंड अडकले. त्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून त्याचे खाणे-पिणेही बंद झाले होते. सैरावैरा फिरत असलेल्या या कुत्र्याचा झी मराठीवरील 'पारु' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री शरयू सोनवणे हिनं जीव वाचवला आहे.
शरयू सोनवणे ही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. नुकताच तिने व्हिडीओ शेअर केला आहे. शरयूने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये एका श्वानाचे प्लास्टिकच्या बरणीत तोंड अडकल्याचे दिसते. ज्यामधून बाहेर येण्यासाठी तो संघर्ष करताना दिसतोय. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये अभिनेत्रीनं सांगितलं की, "पुणे सिंहगड रोड नांदेड सिटी येथे आज सकाळी साधारण ८ वाजता मला रस्त्यावर एक श्वान दिसला, ज्याचे तोंड एका प्लास्टिकच्या बरणीमध्ये अडकलेले होते. तो मदतीच्या शोधात इकडे-तिकडे पळत होता. गेले जवळपास ३ दिवस तो अन्न-पाणी आणि श्वासासाठी संघर्ष करत होता. खूप लोकांनी त्याला पाहिले, पण कोणीही मदतीसाठी पुढे आले नाही".
अभिनेत्री पुढे म्हणाली, "आपल्याला थेट मदत करता आली नाही तरी एनजीओला फोन करून अशा मुक्या प्राण्यांची मदत करू शकतो. सुदैवाने @hart_pune @swapnilambep यांनी एका फोनवर येऊन सुमारे ४-५ तासांच्या प्रयत्नानंतर रेस्क्यू करून त्याला सुरक्षित बाहेर काढले. माझी सर्वांना विनंती आहे प्लास्टिकची बरणी, काच किंवा कचरा उघड्यावर फेकू नका. भुकेमुळे किंवा तहानेमुळे प्राणी अशा वस्तूंमध्ये तोंड घालतात आणि अडकतात. त्यांना समज नसते, पण आपल्याला आहे. आपल्या थोड्या जबाबदारीमुळे एखाद्या मुक्या जीवाचा जीव वाचू शकतो". शरयूने शेअर केलेल्या या व्हिडीओवर अनेक जणांनी तिच्या कामाला दाद दिली आहे. शरयूच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास तिला 'पिंकीचा विजय असो' या मालिकेतून प्रसिद्धी मिळाली होती. त्यानंतर ती झी मराठीवरील 'पारु' या मालिकेत दिसली.
Web Summary : Actress Sharayu Sonawane rescued a stray dog whose head was stuck in a plastic jar for three days. The dog was struggling to eat or drink. Sharayu urges people not to throw plastic waste openly to protect animals.
Web Summary : अभिनेत्री शरयू सोनवणे ने एक आवारा कुत्ते को बचाया जिसका सिर तीन दिनों से प्लास्टिक के जार में फंसा हुआ था। कुत्ता खाने-पीने के लिए संघर्ष कर रहा था। शरयू ने लोगों से जानवरों की रक्षा के लिए प्लास्टिक कचरा खुले में न फेंकने का आग्रह किया।