Join us  

पायलट लेक आता झाली वैमानिक प्रशिक्षक! शरद पोंक्षे म्हणतात, "एका बापाला..."

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2024 3:13 PM

शरद पोंक्षेंची पायलट असलेली लेक सिद्धीने आता तिच्या करिअरमध्ये आणखी मोठी मजल मारली आहे. यामुळे तिचं कौतुक होतंय

शरद पोंक्षे हे मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेते. शरद पोंक्षेंना आपण आजवर विविध माध्यमांत अभिनय करताना पाहिलंय. शरद पोंक्षे सोशल मीडियावर त्यांच्या विविध राजकीय, सामाजिक विषयांवरील वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. शरद पोंक्षे त्यांच्या कौटुंबिक आयुष्यात घडणाऱ्या घडामोडींचे अपडेट्स सुद्धा त्यांच्या फॅन्ससोबत शेअर करत असतात. अशातच पायलट असलेल्या शरद पोंक्षेंच्या लेकीने तिच्या करिअरमध्ये आणखी एक मजल मारली आहे.

शरद पोंक्षेंची लेक सिद्धी काहीच दिवसांपुर्वी पायलट झाली हे आपल्या सर्वांना माहित आहे. आता शरद पोंक्षेंची लेक फ्लाईट इंन्स्ट्रक्टर झाली आहे. शरद यांनी लेकीचा खास फोटो शेअर करत ही माहिती सर्वांना दिली. शरद पोंक्षे लिहीतात,  "महिला दिनाच्या शुभेच्छा माझी मुलगी सिध्दी आधी पायलट व काल flight instructor झाली. स्वकष्टाने ,मेहनतीने,कोणाच्याही मदती शिवाय,तिने हे यश संपादन केलय.एका बापाला आणखी काय हव? अभिनंदन सिध्दी."

अशाप्रकारे शरद यांनी लेकीचं कौतुक केलंय. शरद यांच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर... ते नुकतंच 'ही अनोखी गाठ' या मराठी सिनेमात दिसले.  याशिवाय शरद हे मराठी, हिंंदी टेलिव्हिजन आणि मालिकाविश्वात सक्रीय आहेत.

टॅग्स :शरद पोंक्षेमराठी