Join us

कुमार सानू यांनी लोकांच्या भीतीने १७ वर्षे लपवून ठेवली लेकीबद्दलची ‘ही’ गोष्ट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2018 06:18 IST

९० च्या दशकांत आपल्या गाण्यांनी देशांतील कोट्यवधी लोकांना वेड लावणारे बॉलिवूड गायक कुमार सानू यांनी गेल्या १७ वर्षांपासून एक गोष्ट जगापासून लपवून ठेवली होती.

 ९० च्या दशकांत आपल्या गाण्यांनी देशांतील कोट्यवधी लोकांना वेड लावणारे बॉलिवूड गायक कुमार सानू यांनी गेल्या १७ वर्षांपासून एक गोष्ट जगापासून लपवून ठेवली होती. मात्र ‘दिल है हिंदुस्तानी2’ या रिअ‍ॅलिटी शोच्या सेटवर त्यांनी हे रहस्य जगजाहिर केले. होय, २००१ मध्ये कुमार सानू यांनी एक मुलगी दत्तक घेतली होती. पण गत १७ वर्षांत केवळ लोकांच्या भीतीने त्यांनी ही गोष्ट दडवून ठेवली. पण हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या ताज्या मुलाखतीत कुमार सानू यावर अगदी बिनधास्तपणे बोलले.

 मी मुलीला दत्तक घेतले, ही गोष्ट मी जगापासून लपवली. कारण मी घाबरत होतो. माझ्या या निर्णयाचा लोक कसा अर्थ काढतील? याचा माझ्या मुलीला त्रास तर होणार नाही ना? अशी भीती माझ्या मनात होती. पण आता लोकांना जे कळायचे ते कळले आहे. आज मला माझ्या त्या निर्णयाचा अभिमान वाटतो. शेनन ही माझी स्वत:ची मुलगी आहे की नाही, याने आज मला काहीही फरक पडत नाही. ती माझी मुलगी आहे आणि मी तिचा बाप आहे, हेच माझ्यासाठीसाठी महत्त्वाचे आहे, असे कुमार सानू म्हणाले.

तुम्हाला ठाऊक असेलचं की, कुमार सानू यांची मुलगी शेनन ही सुद्धा एक गायिका आहे. सध्या ती ब्रिटनमध्ये राहते. शेननचे अलीकडे ‘अ लॉन्ग टाईम’ हे पॉप सिंगल रिलीज झाले. जगप्रसिद्ध पॉप गायक जस्टीन बीबरचा सहकारी जेसन बॉयडने हे गाणे लिहिले आहे.कुमार सानू यांनी अनेक अजरामर गाणी गायलीत. तेरे दर पर सनम, तुम्हे अपना बनाने की कसम, तू प्यार है किसी और का, चुरा के दिल मेरा, लडकी बडी अंजानी है ही त्यांची गाणी प्रचंड लोकप्रीय झालीत. आजही ही गाणी श्रोते आवडीने ऐकतात.

 

टॅग्स :कुमार सानू