Join us
Daily Top 2Weekly Top 5

बहोत अच्छा आदमी था...!! सुशांतसाठीची शक्ती कपूर यांची ही कविता ऐकून डोळ्यांत पाणी येईल ...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2020 14:47 IST

शक्ती कपूर यांनी एक हृदय हेलावून टाकणारी कविता शेअर केली आहे.

ठळक मुद्देशक्ती कपूर यांनी याआधीच सुशांतच्या मृत्यूवर प्रतिक्रिया दिली होती.

सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यू सगळ्यांनाच चटका लावून गेला़ रविवारी त्याने आत्महत्या केली. सुशांतसारख्या जिंदादिल व्यक्तिने आत्महत्या का करावी, हा प्रश्न अद्यापही अनेकांच्या मनात आहे. आता बॉलिवूड अभिनेते शक्ती कपूर यांनी सुशांतला अनोख्या पद्धतीने श्रद्धांजली वाहिली आहे़. त्यांनी एक हृदय हेलावून टाकणारी कविता शेअर केली आहे.शक्ती कपूर यांनी ऐकवलेली ही कविता दिल्लीच्या एका मित्राने त्यांना फॉरवर्ड केली होती. शक्ती कपूर यांनी ही कविता सर्वांशी शेअर केली.

बहोत अच्छा आदमी था...अरे कुछ तो कुछ ना बोलना था नाउसके जनाजे में कुछ तो कहना था नाअगर नहीं कहते तो जमाने को भी तुम्हारी अच्छाई पे शक हो जाता...अशा आशयाची ही कविता आहे.शक्ती कपूर यांनी याआधीच सुशांतच्या मृत्यूवर प्रतिक्रिया दिली होती. त्याच्या आत काय सुरु होते, हे आपल्याला ठाऊक नाही. त्याच्या डिप्रेशनचे काय कारण होते, हेही आपल्याला ठाऊक नाही. पण कारण काहीही असो, आत्महत्या करणे मी पाप मानतो. काहीही झाले तरी कोणीही आत्महत्या करून स्वत:ला संपवायला नको, असे ते म्हणाले होते.

टॅग्स :शक्ती कपूरसुशांत सिंग रजपूत