Join us
Daily Top 2Weekly Top 5

श्रद्धा कपूरच्या आईने केले आहे चित्रपटात काम, पहिल्याच भेटीत पडली होती शक्ती कपूरच्या प्रेमात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2019 21:00 IST

शिवांगी यांनी किस्मत या चित्रपटात शक्ती कपूरसोबत काम केले होते. याच चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान त्यांची पहिली भेट झाली होती. त्यांची प्रेमकथा खूपच इंटरेस्टिंग आहे.

ठळक मुद्देपहिल्याच भेटीत शिवांगी यांना शक्ती आवडले होते. त्या दोघांनी दोन वर्षांच्या अफेअरनंतर लग्न केले. पण या लग्नाला शिवांगीच्या घरातल्यांचा विरोध होता. घरातल्यांचा विरोध असल्याने शिवांगी यांनी घरातून पळून लग्न केले होते.

शक्ती कपूरने एक खलनायक, विनोदी कलाकार म्हणून बॉलिवूडमध्ये एक खास जागा निर्माण केली आहे. त्याने बॉलिवूडचा एक काळ गाजवला होता असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. शक्तीच्या पावलावर पाऊल ठेवून त्याची मुलगी श्रद्धा कपूरने देखील बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. श्रद्धा कपूरने खूपच कमी वेळात एक अभिनेत्री, गायिका, गीतकार आणि डिझायनर म्हणून स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. 'आशिकी 2', 'एक व्हिलन', 'एबीसीडी 2', 'बागी', 'रॉक ऑन 2' 'स्त्री' अशा तिच्या विविध सिनेमातील भूमिका रसिकांना भावल्या आहेत. आजच्या पिढीची नायिका म्हणून श्रद्धाने तरुणाईच्या मनात अढळ स्थान मिळवलं आहे. श्रद्धाचा साहो आणि छिछोरे हे दोन चित्रपट नुकतेच प्रदर्शित झाले असून या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे.

शक्ती कपूर गेली अनेक वर्षं चित्रपटसृष्टीचा भाग आहे. तुम्हाला माहीत आहे का, शक्ती कपूरने प्रसिद्ध अभिनेत्री पद्मिनी कोल्हापूरेच्या बहिणीसोबत लग्न केले असून त्याच्या पत्नीचे नाव शिवांगी कपूर आहे. शिवांगी यांनी किस्मत या चित्रपटात शक्ती कपूरसोबत काम केले होते. खरे तर हा चित्रपट आधी पद्मिनी कोल्हापूरेला ऑफर करण्यात आला होता. पण काही कारणास्तव पद्मिनीला या चित्रपटात काम करणे शक्य झाले नाही आणि या चित्रपटात शिवांगी यांची वर्णी लागली. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अयशस्वी ठरला. पण याच चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान शिवांगी आणि शक्ती कपूर यांच्यात अफेअर सुरू झाले आणि त्यांनी 1982 मध्ये कोर्टात लग्न केले. 

शिवांगी आणि शक्ती कपूर यांची लव्हस्टोरी खूपच इंटरेस्टिंग आहे. शक्ती आणि शिवांगी एकाच चित्रपटात असले तरी त्या दोघांचा एकही सीन एकत्रित शूट होणार नव्हता. त्यामुळे त्यांना चित्रीकरणासाठी वेगवेगळ्या तारखा देण्यात आल्या होत्या. पण शुटिंगच्या तारखा ऐनवेळी बदलल्याने त्यांना एकाच तारखांना चित्रीकरणाला बोलवण्यात आले आणि त्यांची भेट झाली.

पहिल्याच भेटीत शिवांगी यांना शक्ती आवडले होते. त्या दोघांनी दोन वर्षांच्या अफेअरनंतर लग्न केले. पण या लग्नाला शिवांगीच्या घरातल्यांचा विरोध होता. शिवांगी या लग्नाच्यावेळेस केवळ 18 वर्षांच्या होत्या. घरातल्यांचा विरोध असल्याने शिवांगी यांनी घरातून पळून लग्न केले होते. लग्नानंतर देखील अनेक वर्षं शिवांगी आणि त्यांच्या कुटुंबियांमध्ये काहीच संपर्क नव्हता. पण श्रद्धा आणि सिद्धांतच्या जन्मानंतर शिवांगी यांच्या कुटुंबियांनी त्यांना स्वीकारले.  

टॅग्स :शक्ती कपूरश्रद्धा कपूरपद्मिनी कोल्हापुरे