Join us
Daily Top 2Weekly Top 5

शाहरुखला ‘झिरो’पासून पुन्हा बनायचं हिरो, किंग खानला साकारायचा आहे ‘क्रिकेटचा किंग कोहली’

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2018 11:34 IST

सायना नेहवाल आणि सानिया मिर्झा यांच्या जीवनावरील सिनेमांची जोरदार चर्चा आहे. या चर्चा सुरू असताना आता किंग खान शाहरुखलाही रुपेरी पडद्यावर क्रिकेटपटूची भूमिका साकारायची आहे.

ठळक मुद्दे‘जब हॅरी मेट सेजल’ सिनेमातील लूकचं उदाहरण देत आपण विराटसारखं दिसू शकतो असं शाहरुखने सांगितलं. किंग खानला रुपेरी पडद्यावर विराट कोहलीची भूमिका साकारायची इच्छा‘झिरो’चं हे अपयश बाजूला सारत आता शाहरुखने एका क्रिकेटरची भूमिका साकारायला आवडेल असं म्हटलंय.

चित्रपटसृष्टीत बायोपिकचा ट्रेंड चांगलाच यशस्वी ठरला आहे. मेरी कोम, मिल्खा सिंग, महेंद्रसिंह धोनी या खेळाडूंच्या जीवनावरील सिनेमा रुपेरी पडद्यावर यशस्वी ठरले आहेत. या सिनेमांना रसिकांनी डोक्यावर घेतलं आहे. आता आगामी काळात आणखी काही खेळाडूंच्या जीवनावर सिनेमा बनणार आहेत. यांत सायना नेहवाल आणि सानिया मिर्झा यांच्या जीवनावरील सिनेमांची जोरदार चर्चा आहे. या चर्चा सुरू असताना आता किंग खान शाहरुखलाही रुपेरी पडद्यावर क्रिकेटपटूची भूमिका साकारायची आहे.

शाहरुखचा ‘झिरो’ हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. मात्र या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर अपेक्षित यश मिळालं नाही. ‘झिरो’चं हे अपयश बाजूला सारत आता शाहरुखने एका क्रिकेटरची भूमिका साकारायला आवडेल असं म्हटलंय. हा क्रिकेटर दुसरा तिसरा कोणी नसून भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आहे. किंग खानला रुपेरी पडद्यावर विराट कोहलीची भूमिका साकारायची इच्छा आहे. एका मुलाखतीदरम्यान त्याने ही इच्छा बोलून दाखवली. इतकंच नाही तर ‘जब हॅरी मेट सेजल’ या सिनेमातील लूक विराटसारखाच होता असंही तो म्हणाला.

या मुलाखतीदरम्यान शाहरुखसोबत विराटची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्मादेखील होती. विराटची भूमिका साकारण्यासाठी त्याच्यासारखी दाढी वाढवावी लागेल असं अनुष्काने त्याला गंमतीने म्हटलं. त्यावर ‘जब हॅरी मेट सेजल’ सिनेमातील लूकचं उदाहरण देत आपण विराटसारखं दिसू शकतो असं शाहरुखने सांगितलं. आता शाहरुखला विराटची भूमिका साकारायची असेल तर या सिनेमात विराटची गर्लफ्रेंड आणि पत्नी अनुष्काची भूमिका कोण साकारणार?, अनुष्काच ही भूमिका साकारणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. 

टॅग्स :शाहरुख खानविराट कोहलीअनुष्का शर्माझिरो सिनेमा