Join us
Daily Top 2Weekly Top 5

जेव्हा सिनेमातील बेड सीन शूट करताना शाहरूख- काजोल झाले होते अनकंम्फर्टेबल, मग घडलं असं काही

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2021 12:17 IST

शाहरुख खान आणि काजोलची जोडी बॉलिवूडमधील सुपरहिट जोड्यांपैकी एक आहे.

 शाहरुख खान आणि काजोलची जोडी बॉलिवूडमधील सुपरहिट जोड्यांपैकी एक आहे.  शाहरुख-काजोल खऱ्या आयुष्यात खूप चांगले मित्र आहेत आणि शूटिंग दरम्यान दोघीही खूप मजा करतात. 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानचा एक किस्सा अभिनेत्रीने शेअर केला होता.  या चित्रपटाच्या सेटवर शाहरुखने रोमँटिक सीनच्या शूटिंग दरम्यान असे काही केले होते की काजोल हैराण झाली होती. 

शाहरुख खान आणि काजोल यांना सिनेमातील एक रोमँटिक सीन शूट करायचा होता, ज्याच्या शूटिंगसाठी त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला.  'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'  सिनेमातील सर्व गाणी ब्लॉकबस्टर होती आणि यातील सीनपण आयकॉनिक होते. 

सिनेमात शाहरुख आणि काजोलचा बेडवरील एक सीन होता. याच्याशी निगडीत एक मजेशीर किस्सा काजोलने सांगितला होता. आदित्य चोप्राला हा सीन स्टीमी बनवायचा होता, पण सीन शूट करण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. काजोलने सांगितले होते की, जेव्हा ते या सीनचे शूटिंग करीत होते तेव्हा ती आणि शाहरुख हसत होते. या सीन्ससाठी त्यांना बरेच रिटेक्स द्यावे लागले. 

या सीन दरम्यान शाहरुखला काही सीरिअस डायलॉग्स बोलायचे होते पण दोघे जेव्हा एकमेकांकडे बघायचे त्यांनी हसू यायचे. त्यामुळे या सीनचे शूटिंग करणं फार कठीण जातं होते. मात्र, हा सीन पूर्ण झाल्यानंतर खूप हिट झाला होता.  

काजोलने पुढे सांगितले होते की 'मेरे ख्वाबों में जो आए' या गाण्याचे शूट करण्यास सुरुवातीला खूपच अस्वस्थ वाटले. तिला फक्त एका टॉवेलमध्ये शूट करण्याची आइडिया आवडली नाही. पण आदित्य चोप्राने तिचे या सीन्ससाठी अखेर मन वळवले. 

टॅग्स :काजोलशाहरुख खान