Join us
Daily Top 2Weekly Top 5

Don 3 Update : शाहरुखचा 'डॉन 3' येणार? निर्माता रितेश सिधवानी म्हणाले, "स्क्रीप्टवर काम सुरु पण..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2023 12:53 IST

नुकतंच सिनेमाचे निर्माता रितेश सिधवानी यांनी डॉन ३ बाबत नवी माहिती दिली आहे.

Don 3 : फरहान अख्तर दिग्दर्शित शाहरुख खानच्या (Shahrukh Khan) 'डॉन' सिरीजचे चाहते काही कमी नाहीत. 'डॉन' आणि 'डॉन २' ने सिनेमागृहात अक्षरश: धुमाकूळ घातला होता. यानंतर 'डॉन ३' कधी येणार अशी सतत विचारणा होत होती. आता याबद्दल अपडेट समोर आलं आहे. नुकतंच सिनेमाचे निर्माता रितेश सिधवानी यांनी डॉन ३ बाबत नवी माहिती दिली आहे.

निर्माता रितेश सिधवानी एका मुलाखतीत म्हणाले,"फरहान सध्या डॉन ३ च्या स्क्रीप्टवर काम करत आहे. मात्र मला फिल्मच्या कथेबद्दल काहीच कल्पना नाही.जोपर्यंत फरहानचं लिखाण संपत नाही तोपर्यंत आम्ही काहीही करणार नाही. सध्या तो स्क्रीप्ट पूर्ण करण्यात व्यस्त आहे. आम्ही सुद्धा डॉन ३ साठी आतुर आहोत."

तर डॉन ३ बद्दल पहिल्यांदाच ही अधिकृत माहिती समोर आली आहे. त्यामुळे चाहतेही भलतेच खूश आहेत. मात्र आता एकच प्रश्न आहे की डॉन ३ मध्ये 'जंगली बिल्ली' प्रियंका चोप्रा दिसणार का? डॉन २ नंतर प्रियंका आणि शाहरुखच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं होतं. या चर्चांनंतर दोघांनीही पुन्हा एकत्र काम केलं नाही. आता डॉन ३ साठी मेकर्स काय निर्णय घेणार याकडे चाहत्यांचं लक्ष आहे.

टॅग्स :शाहरुख खानफरहान अख्तरसिनेमा