Join us

KKR सामना जिंकल्यावर शाहरुखच्या 'त्या' छोट्याश्या कृतीनं जिंकली लाखो चाहत्यांची मनं, पाहा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2024 15:34 IST

KKR चा सामना जिंकल्यावर शाहरुख खानच्या एका कृतीने लाखो चाहत्यांची मनं जिंकली आहेत. असं काय केलं शाहरुखने बघा व्हिडीओ (kkr, shahrukh khan)

शाहरुख खानला बॉलिवूडचा बादशाह म्हणून ओळखलं जातं. शाहरुख लाखो चाहत्यांच्या हृदयावर राज्य करतो. किंग खान आज ज्या मुक्कामी आहे तिथे तो सहजासहजी नाही पोहोचलाय. प्रचंड मेहनत, चिकाटीच्या जोरावर शाहरुखने आज यशाचं शिखर गाठलंय. शाहरुख कायमच त्याच्या छोट्या छोट्या कृतींनी चाहत्यांचं मन जिंकत असतो. अशातच शाहरुखने काल KKR चा सामना संपल्यावर एक छोटी गोष्ट केलीय, ज्यामुळे त्याचं कौतुक होतंय. 

काल KKR चा सामना संपल्यानंतर शाहरुखच्या एका चाहत्याने त्याचा व्हिडिओ शेअर केलाय. काल कोलकाता येथील ईडन गॉर्डन येथे KKR चा सामना झाला. यावेळी शाहरुख खानही त्याच्या टीमला चिअर अप करण्यासाठी तिथे उपस्थित होता. सामना संपल्यानंतर सगळे निघून गेले. मात्र शाहरुख खानने 'कोलकाता नाईट रायडर्स' टीमचे झेंडे पडलेले पाहिले. कोणालाही न बोलावता शाहरुखने स्वत: ते झेंडे गोळा करण्यास सुरुवात केली.

व्हिडीओमध्ये तुम्ही बघाल की, शाहरुख VIP सेक्शनमध्ये जमिनीवर फेकलेले KKR चे झेंडे व्यवस्थित उचलताना दिसत आहे. शाहरुखला अशी गोष्ट करताना पाहून त्याचे चाहते त्याच्या नावाचा जयघोष करतात. सर्व झेंडे उचलल्यानंतर शाहरुख वळतो आणि त्याच्या चाहत्यांना फ्लाइंग किस देतो. स्वतःच्या टीमचा आणि टीमच्या प्रतिमेचा शाहरुखने केलेला आदर बघून किंग खानने सर्वांचं मन जिंकलंय. 

टॅग्स :शाहरुख खानकोलकाता नाईट रायडर्सआयपीएल २०२४