Join us
Daily Top 2Weekly Top 5

तर शाहरूख खान आणि करिना कपूर दिसतील एकत्र!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2018 10:30 IST

'वीरे दी वेडिंग'मधून करिना कपूरने बॉलिवूडमध्ये कमबॅक केला आणि त्यानंतर ती तिच्याकडे सिनेमाची लाईन लागल्याची कळतेय

ठळक मुद्दे सैल्यूटमध्ये शाहरुख खान अंतराळवीर राकेश शर्मा यांची भूमिका साकारणार आहेयाआधी हा सिनेमा आमिरला ऑफर करण्यात आला होता

'वीरे दी वेडिंग'मधून करिना कपूरने बॉलिवूडमध्ये कमबॅक केला आणि त्यानंतर ती तिच्याकडे सिनेमाची लाईन लागल्याची कळतेय. काही दिवसांपूर्वीच आम्ही तुम्हाला सांगितले होते की, करिनाला करण जोहरच्या आगामी सिनेमासाठी कास्ट करण्यात आले आहे ज्यात ती अक्षय कुमारच्या अपोझिट दिसणार आहे. त्यानंतर अशी माहिती मिळतेय की, करिनाला शाहरुख खानच्या 'सैल्यूट'साठी अप्रोच करण्यात आले आहे.  सैल्यूटमध्ये शाहरुख खान अंतराळवीर राकेश शर्मा यांची भूमिका साकारणार आहे. हा राकेश शर्मा यांचा बायोपिक आहे. याआधी हा सिनेमा आमिरला ऑफर करण्यात आला होता मात्र त्याच्याकडे डेट्स नसल्यामुळे शाहरुखला या बायोपिकसाठी अप्रोच करण्यात आले. तर आमिरच्या पत्नीच्या भूमिकेसाठी प्रियांकाचे नाव चर्चेत होते. मात्र तिने ही भूमिका साकारण्यासाठी नकार दिल्याचे कळतेय. करिनाला यात शाहरुखच्या पत्नीच्या भूमिकासाठी संपर्क करण्यात आला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय.  या आठवड्यात करिना हा सिनेमा साईन करण्याची शक्यता आहे. जर करिनाने हा सिनेमा साईन केला तर तब्बल सात वर्षांनंतर करिना आणि शाहरुख स्क्रिन शेअर करताना दिसतील.

'सैल्यूट'चे दिग्दर्शन महेश मथाई करणार आहेत. राकेश शर्मा यांनी २ एप्रिल १९८४ साली सोयुझ टी-११ या यानातून अंतराळात जाणारा पहिला भारतीय म्हणून मान मिळविला होता. ३५ व्या राष्ट्रीय संरक्षण अकादमीचे विद्यार्थी असणारे राकेश शर्मा हे भारतीय वायूदलात टेस्ट पायलट म्हणून १९७० साली सहभागी झाले.      

 तूर्तास शाहरूख खान ‘झीरो’मध्ये बिझी आहे.शाहरुख खान या चित्रपटात एका बुटक्या व्यक्तीची भूमिका साकारणार आहे.  या चित्रपटातील  शाहरूखची व्यक्तीरेखा ‘गेम आॅफ थ्रोन्स’ या इंग्रजी सीरिजमधील टीरिनयल लेनिस्टर या पात्रावर आधारित असल्याचे सांगितले जात आहे. म्हणजेच, ही बुटकी व्यक्ती दुस-या लोकांमध्ये प्रेम वाढवून त्यांच्यातील दुवा ठरेल. ‘गेम आॅफ थ्रोन्स’ प्रेक्षकांच्या आवडीची शृंखला आहे. ख्रिसमसच्या मुहूर्तावर शाहरुखचा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

टॅग्स :शाहरुख खानकरिना कपूर