Join us

कबीर सिंगनंतर शाहिदने घेतला होता ब्रेक, आता करायचं हे काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2019 10:00 IST

कबीर सिंग सारखा हिट सिनेमा दिल्यानंतर शाहिद कपूरने सिनेमातून ब्रेक घेतला होता.

कबीर सिंग सारखा हिट सिनेमा दिल्यानंतर शाहिद कपूरने सिनेमातून ब्रेक घेतला होता. कुटुंबीय आणि मित्रांसोबत  क्वॉलिटी टाईम स्पेंट केल्यानंतर शाहिदला आता सिनेमात परतायचे आहे. 

मोठा ब्रेक घेतल्यानंतर शाहिद सेटवर परत येण्यासाठी आतुर आहे. नवभारत टाईम्सच्या रिपोर्टनुसार, शाहिद म्हणाला ब्रेक घेणे फारचं चांगले आहे कारण तुम्हाला  कुटुंबीयांसोबत क्वॉलिटी टाईमस्पेंट करण्याची संधी मिळते. पुढे तो म्हणाला, मला अॅवॉर्ड फंक्शनला सुद्धा जायचे असेल तरी, मी नव्हर्स होतो कारण गेल्या खूप वेळा पासून मी कॅमेरा फेस केला नाहीय. 

शाहिद कपूर लवकरच साऊथच्या ‘जर्सी’ सिनेमाच्या रिमेकमध्ये दिसणार आहे. ‘जर्सी’च्या रिमेकसाठी त्याने 35 कोटी रूपये मानधन घेतल्याचे मानले जात आहे. पण आता या बातमीची सत्यता समोर आली आहे. होय, चित्रपटाशी संबंधित एका सूत्राने या बातमीत काहीही तथ्य नसल्याचे म्हटले आहे.

‘जर्सी’ या तेलुगू चित्रपटातील मुख्य पात्राचे नाव अर्जुन होते. ही भूमिका दाक्षिणात्य अभिनेता नानीने केली होती.  भारतीय क्रिकेट संघात सहभागी होण्यासाठी अर्जुनचा संघर्ष या चित्रपटात दाखवण्यात आला होता. आता हिंदीत हा संघर्ष पाहायला मिळणार आहे. ‘जर्सी’ चित्रपटाच्या हिंदी रिमेकची निर्मिती अल्लु अरविंद, अमन गिल आणि दिल राजू करणार आहेत. दिग्दर्शक गौथम हा चित्रपट दिग्दर्शित करणार आहेत.

टॅग्स :शाहिद कपूर