Join us
Daily Top 2Weekly Top 5

वयाच्या ५२ व्या वर्षी शाहिद कपूरचा सावत्र पिता बनला बाप , समोर आले फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2019 15:17 IST

शब्दांच्या पलीकडे आहे सगळे त्यामुळे जेव्हा वंदना प्रेग्नंट असल्याचे कळाले तेव्हा तो आनंद गगनात मावेनासा होता. आणि आज आम्ही दोघेही खूप खुश आहोत अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.

बॉलिवूड अभिनेता आणि शाहिद कपूरचे सावत्र पिता राजेश खट्टर वयाच्या ५२ व्या वर्षी पुन्हा एकदा पिता बनले आहेत. राजेशने अभिनेत्री वंदना सजनानीसह लग्न केले आहे. लग्नानंतर दहा वेळा प्रयत्नानंतर या दोघांच्या आयुष्यात हे सुख आल्याचेही राजेशने सांगितले. खुद्द राजेश खट्टरनेच बॉम्बे टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत ही गोष्ट सांगितली आहे.

 

 

या वयात पुन्हा एकदा पिता बनणे हे खरेच माझ्यासाठी मोठे आव्हान होते. हा निर्णय घेणे आणि बाळाला जन्म देणे हे पत्नी वंदना सजनानी आणि आपल्यासाठी खूप कठीण निर्णय होता असं राजेश यांनी सांगितलं. मात्र हे नातेच वेगळे असते. शब्दांच्या पलीकडे आहे सगळे त्यामुळे जेव्हा वंदना प्रेग्नंट असल्याचे कळाले तेव्हा तो आनंद गगनात मावेनासा होता. आणि आज आम्ही दोघेही खूप खुश आहोत अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली. 

खरंतर वंदना जुळ्या मुलांना जन्म देणार असे डॉक्टरांनी सांगितले होते. मात्र काही समस्यामुळे एका बाळाचा गर्भातच मृत्यू झाला आणि वंदना एकाच मुलाला जन्म देऊ शकली असंही राजेश यांनी सांगितले आहे. या मुलाचे नाव त्यांनी वनराज कृष्णा असे ठेवले आहे.  

शाहिद कपूर हा पंकज कपूर आणि नीलीमा अजीज यांचा मुलगा आहे. जेव्हा शाहिद फक्त तीन वर्षाचा होता तेव्हा पंकज कपूर आणि नीलीमा यांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर पंकज कपूर यांनी अभिनेत्री सुप्रिया पाठकसह लग्न केले आणि नीलीमा यांनी राजेश खट्टरसह लग्न केले. त्यानंतर यादोघांचाही घटस्फोट झाला. ईशान खट्टर हा शाहिद कपूरचा सावत्र भाऊ आहे.

टॅग्स :शाहिद कपूरइशान खट्टर