Join us
Daily Top 2Weekly Top 5

शाहिद कपूर आजही विसरला नाही त्याने केलेली ती चूक, वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2020 19:29 IST

'कबीर सिंग'च्या दरम्यान त्याने हा खुलासा केला होता.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २१ दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला आहे. त्यामुळे जनजीवन ठप्प झालं. अभिनेता शाहिद कपूर लॉक डाऊन संपल्यानंतर आणि कोरोनाचे संकट निवळल्यानंतर जर्सी सिनेमाच्या शूटींगला पुन्हा एकदा सुरु होईल. याआधी आलेला शाहिदचा कबीर सिंग हा सिनेमा चांगलाच हिट झाला होता. कबीर सिंगच्या प्रमोशन दरम्यान दिलेल्या एका मुलाखतीत त्याने एका खुलासा केला होता. त्याने आमिर खानचा सिनेमा रिजेक्ट केल्याचा पश्चाताप त्याला आजही होतो असे तो म्हणाला होता.   

आमिर खानचा सुपरहिट सिनेमा 'रंग दे बसंती'मध्ये शाहिद कपूरला सिद्धार्थचा रोल ऑफर करण्यात आला होता. सिद्धार्थने सिनेमात करण सिंघानियाची भूमिका साकारली होती. त्यावेळी शाहिदने ही भूमिका नाकारली होती. राकेश ओमप्रकाश मेहराने या सिनेमाचे दिग्दर्शन केले होते. 2006मधला सगळ्यात सुपरहिट सिनेमा ठरला होता. या सिनेमाने अनेक अॅवॉर्ड्स आपल्या नावावर केले होते.

वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर शाहिद कपूरचा ‘जर्सी' सिनेमा एका दाक्षिणात्य चित्रपटाचा हा रिमेक आहे. ‘जर्सी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन गौथम तिन्नानूरी यांनी केले असून हिंदी रिमेकचे दिग्दर्शनही तेच करणार आहेत. शाहिदचे वडील पंकज कपूरही यात कोचची भूमिका साकारताना दिसणार आहेत.

सिनेमात भारतीय क्रिकेट संघात सहभागी होण्यासाठी अर्जुनचा संघर्ष दाखवण्यात आला आहे. आता हाच संघर्ष शाहिद कपूर पडद्यावर जिवंत करणार आहे. शाहिदचा हा सिनेमा 28 ऑगस्ट 2020 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

टॅग्स :शाहिद कपूर