Join us
Daily Top 2Weekly Top 5

ब्रेकअपनंतर करिनासोबत असं होतं शाहिदचं नातं, अभिनेत्रीसोबत सर्वात आधी शेअर केली होती 'ही' गुडन्यूज

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2023 19:00 IST

2007 मध्ये ब्रेकअप झाल्यानंतर शाहिद आणि करिना कपूर एकत्र दिसले नाहीत.

करिना कपूर आणि शाहिद कपूर ही जोडी एकेकाळी बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय जोडी होती. या दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. 'जब वी मेट' हा चित्रपट शाहिद आणि करिना दोघांच्याही कारकिर्दीत मैलाचा दगड ठरला. पण या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान या दोघांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आणि दोघांनी आपले मार्ग वेगळे केले.

2007 मध्ये ब्रेकअप झाल्यानंतर दोघेही एकत्र दिसले नाहीत. पण दोघांमध्ये मैत्रीचे नातं कायम राहिले आहेत. बेबोने एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते की, मीरा राजपूतसोबत लग्नाआधी शाहिदने स्वतः तिला मीराबद्दल सांगितले होते. खरंतर हे दोन्ही कलाकार एका शोमध्ये परफॉर्म करत होते आणि त्याचदरम्यान दोघांची भेट झाली.

एका शोदरम्यान जेव्हा दोघांची भेट झाली तेव्हा करिना आई होणार होते आणि शाहिद कपूरचे लग्न ठरलं होतं. दोघेही आपआपल्या आयुष्यात पुढे निघून गेले होते. त्यादरम्यान खुद्द शाहिदने बेबोला मीरासोबत लग्न ठरल्याची बातमी सांगितली. मुलाखतीदरम्यान अभिनेत्रीने सांगितले होते की, ती अभिनेत्यासाठी खूप आनंदी आहे. ती म्हणाला होता की शाहिदने त्याच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यात खूप प्रगती केली आहे आणि ती त्याच्यासाठी खूप आनंदी आहे.

दुसरीकडे शाहिदने त्याच्या एका जुन्या मुलाखतीत करिना प्रेग्नंट पाहून खूप आनंद झाल्याचेही सांगितले होते. त्याने करिनाचे मनापासून अभिनंदन केले. शाहिद कपूर आणि मीरा राजपूत दोन मुलांचे पालक झाले आहेत. तर करिना आणि सैफ अली खान हे दोन मुलांचे आई-वडील आहेत.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर शाहिद कपूरची 'फर्जी' ही वेब सिरीज नुकतीच रिलीज झाली आहे. या सीरिजमध्ये त्याने केलेल्या अभिनयाचे खूप कौतुक झाले आहे. तर करीना शेवटची गतवर्षी 'लाल सिंह चढ्ढा' या चित्रपटात दिसली होती.

टॅग्स :शाहिद कपूरकरिना कपूर