बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरचा बहुप्रतिक्षीत चित्रपट ‘कबीर सिंह’चा टीजर अखेर रिलीज झाला. ‘कबीर सिंह’ हा साऊथचा सुपरडुपर हिट चित्रपट ‘अर्जुन रेड्डी’चा रिमेक आहे. त्यामुळे प्रत्येकजण तो पाहण्यास उत्सुक आहे. ‘मी असाच बंडखोर नाही... हा मी आहे...,’ असे लिहित शाहिदने ‘कबीर सिंह’चा टीजर शेअर केला आहे.हा टीजर बघता क्षणी प्रेमात पाडतो. शाहिद कपूर पुन्हा एकदा चाहत्यांना आश्चर्याचा धक्का देणार, हे टीजरची पहिली फ्रेम पाहिल्यानंतर लक्षात येते. शाहिदने आपल्या करिअरमध्ये अनेक फ्लॉप सिनेमे दिलेत. पण तरिही त्याच्या अदाकारीसाठी कौतुक हे झालेच. ‘कबीर सिंह’मधील त्याचा अभिनयही याच तोडीचा दिसतोय.
धीस इज मी...! शाहिद कपूरच्या ‘कबीर सिंह’चा टीजर आऊट!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2019 14:49 IST
बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरचा बहुप्रतिक्षीत चित्रपट ‘कबीर सिंह’चा टीजर अखेर रिलीज झाला.
धीस इज मी...! शाहिद कपूरच्या ‘कबीर सिंह’चा टीजर आऊट!!
ठळक मुद्दे ‘कबीर सिंह’ हा चित्रपट २१ जून २०१९ ला प्रदर्शित होत आहे.