Join us
Daily Top 2Weekly Top 5

शाहरूख खान ह्या सिनेमाच्या तयारीसाठी जाणार अमेरिकेला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2018 21:00 IST

शाहरूख खानचा 'झिरो' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटानंतर तो बायोपिकच्या चित्रीकरणाला सुरूवात करणार आहे.

ठळक मुद्दे 'सारे जहाँ से अच्छा'मध्ये दिसणार शाहरूख शाहरूख अमेरिकेला जाऊन घेणार ट्रेनिंग

राकेश शर्मा यांचा बायोपिक 'सारे जहाँ से अच्छा'मध्ये आमीर खानने काम करण्यास नकार दिला, मात्र आता या सिनेमात अभिनेता शाहरूख खान दिसणार आहे. शाहरूखला ही स्क्रीप्ट आवडली असून त्याने हा सिनेमा साइनदेखील केला आहे. या चित्रपटासाठी शाहरूखला राकेश शर्मांसारखा लूक करावा लागणार आहे आणि त्यासाठी त्याला मेंटली व फिजिकली तयारी करावी लागणार आहे. 

बॉलिवूड लाइफच्या रिपोर्टनुसार, या चित्रपटासाठी शाहरूख अमेरिकेला जाऊन ट्रेनिंग घेणार आहे. तिथे तो अंतराळवीरांसारखा विषम स्थितीत राहणार आहे. त्यामुळे तो या सिनेमातील भूमिका चांगल्याप्रकारे समजू शकेल आणि अंतराळवीरांना कोणकोणत्या गोष्टींचा सामना करावा लागतो, हे देखील समजेल. शाहरूख या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सप्टेंबरमध्ये सुरूवात करणार होता. मात्र आनंद एल. रॉय यांच्या 'झिरो' चित्रपटामुळे चित्रीकरण पुढे ढकलण्यात आले. तसेच राकेश शर्मा बायोपिकचे नाव आधी सॅल्यूट ठेवण्यात आले होते. मात्र नंतर हे शीर्षक बदलण्यात आले असून आता 'सारे जहाँ से अच्छा' असे ठेवण्यात आले आहे. शाहरूखचा आगामी सिनेमा 'झिरो' डिेसेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात शाहरूख खान एका बुटक्या व्यक्तिच्या भूमिकेत आहे.  यापूवीर्ही अनेक चित्रपटात याच तंत्राचा वापर करून लहानाला मोठे आणि मोठ्याला लहान दाखवण्यात आले आहे. यात अनुष्का एका महिला शास्त्रज्ञाच्या तर कॅटरिना एका व्यसनी अभिनेत्रीची भूमिका वठवणार आहेत. केवळ इतकेच नाही तर काजोल, राणी मुखर्जी, करिश्मा कपूर, दीपिका पादुकोण आणि आलिया भट्ट सुद्धा या चित्रपटात दिसणार आहे. एका गाण्यात सलमान आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीही झळकणार आहेत.  

टॅग्स :शाहरुख खानझिरो सिनेमा