Join us

Aryan Khan: मित्र, मीडिया, लाईफस्टाईल अन् बरंच काही; क्रूझ पार्टीनंतर आर्यनच्या आयुष्यात मोठे बदल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2021 15:58 IST

Aryan Khan: क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणातून जामीन मिळालेल्या आर्यन खानच्या आयुष्यात अनेक गोष्टी बदलल्या

मुंबई: क्रूझ ड्रग्ज पार्टीत झालेल्या अटकेमुळे शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान चर्चेत आला. एनसीबीनं अटक केल्यानंतर आर्यन २६ दिवस तुरुंगात होता. अखेर मुंबई उच्च न्यायालयानं आर्यनला जामीन दिला. त्यानंतर आर्यन जन्नतवर परतला आहे. मात्र आता आर्यनच्या आयुष्यातील बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत.

१. अरबाज मर्चंटसोबतची मैत्रीआर्यनला त्याचा मित्र अरबाज मर्चंटसोबत अटक करण्यात आली. उच्च न्यायालयानं जामीन देताना काही अटी घातल्या. त्यांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष स्वरुपात संपर्कात राहण्याची परवानगी नाही. आर्यन आणि अरबाज एकमेकांचे जवळचे मित्र आहेत. मात्र आता त्यांच्या मैत्रीत अंतर पडलं आहे.

२. माध्यमांपासून दूरशाहरुखचा मुलगा असल्यानं आर्यन खानचा वारंवार माध्यमांशी संबंध येतो. मात्र जामीन मंजूर करताना न्यायालयानं आर्यनला माध्यमांपासून दूर राहण्याची, त्यांच्याकडे कोणतंही विधान न करण्याची अट घातली आहे. 

३. परदेशात जाण्यास परवानगी नाहीआर्यन खानला उच्च शिक्षणासाठी परदेशी जायचं होतं. मात्र आता त्याला मुंबईबाहेरदेखील जाता येणार नाही. जोपर्यंत खटला सुरू आहे, तोपर्यंत आर्यनला मुंबईबाहेर पाऊल ठेवता येणार नाही. आर्यनचा पासपोर्ट एनडीपीएस कोर्टात आहे.

४. बॉडीगार्ड आणि लाईफस्टाईलआर्यन खानसाठी शाहरुख नव्या बॉडीगार्डची नियुक्ती करणार आहे. याशिवाय तणावापासून दूर ठेवण्यासाठी त्याला अलिबागमधील फार्म हाऊसमध्ये ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी कोर्टाची परवानगी घेण्यात येईल. आर्यनच्या डाएट आणि इतर दिनक्रमात बदल करण्याचं काम त्याची आई गौरी खान करणार आहे.

५. ब्रँडेड आरोपीचा टॅगआर्यन खानला जामीन मिळाला असला, तरीही त्याचं आयुष्य आता सोपं राहिलेलं नाही. ड्रग्ज प्रकरणातून अद्याप त्याची सुटका झालेली नाही. जामिनातील अटींनुसार तो अजूनही आरोपीच आहे. तुरुंगातून सुटका झालेली असली, तरी त्याच्यावरील ब्रँडेड आरोपीचा टॅग कायम आहे. त्यामुळे गौरी खान त्याच्यासाठी समुपदेशनाची योजना आखत आहे.

टॅग्स :आर्यन खानशाहरुख खाननार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो