Join us

२६ वर्षात इतकी बदलली शाहरूख खानची ही हिरोईन, किंग खानसोबत काढला सेल्फी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2020 19:57 IST

शाहरूख खानच्या या अभिनेत्रीला आता ओळखणं कठीण झालं आहे.

२५ फेब्रुवारी, १९९४ सली शाहरूख खान व सुचित्रा कृष्णमूर्ती यांचा 'कभी हां कभी ना' चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटाला नुकतेच प्रदर्शित होऊन २६ वर्षे पूर्ण झाले आहेत. यानिमित्ताने शाहरूख व सुचित्रा यांचा एक फोटो सोशल मी़डियावर खूप व्हायरल होतो आहे. 

खरेतर 'कभी हां कभी ना' चित्रपटाला २६ पुर्ण झाल्याच्या निमित्ताने अभिनेत्री सुचित्रा कृष्णमूर्ती हिने सोशल मीडियावर एक ट्विट केले होते. या ट्विटमध्ये शाहरूख खान व सुचित्रा कृष्णमुर्ती दिसत आहेत. या सेल्फीमध्ये सुचित्राची मुलगी कावेरीदेखील आहे.

सोशल मीडियावर हा फोटोला चाहत्यांची खूप पसंती मिळते आहे. सुचित्राने सोशल मीडियावर या चित्रपटाच्या आठवणींना उजाळा दिला आहे. तिने ट्विटरवर लिहिले की, माझ्या जीवनात मी खूप कमी चित्रपटात काम केले आहे. या चित्रपटाचा हिस्सा बनून मी खूप खूश आहे. योग्य वेळेला मी योग्य ठिकाणी होती आणि आज इतक्या वर्षांनी देखील लोक आनाच्या भूमिकेमुळे ओळखतात.

'कभी हां कभी ना' चित्रपटात शाहरूख व सुचित्रा यांच्यासोबत दीपक तिजोरीदेखील मुख्य भूमिकेत होता.

या चित्रपटाचे दिग्दर्शन कुंदन शाहने केले होते.

तर या चित्रपटाची निर्मिती विक्रम मेहरोत्रा यांनी केली होती.  

टॅग्स :शाहरुख खानदीपक तिजोरी