Join us

"पठाण आवडला का?" शाहरुखची चिमुकली चाहती 'नाही' म्हणाली; 'किंग खान'नेही धमाल केली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2023 18:59 IST

पठाण न आवडलेल्या चिमुकल्या चाहतीला शाहरुखने दिलेले उत्तर सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होते. किंग खानच्या चाहत्यांनी कमेंट सेक्शनमध्ये प्रेमाचा वर्षाव केला आहे.

शाहरुख खान त्याच्या पठाण चित्रपटाच्या यशादरम्यान चाहत्यांसोबत #asksrk सेशन करताना दिसतो आहे. चाहते देखील सतत अभिनेत्याला चित्रपटाला घेऊ नवीन प्रश्न विचारताना दिसतायेत. पठाण बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कामगिरी करत असताना, एका छोट्या चिमुकलीला हा चित्रपट आवडला नाही, ज्यावर किंग खाननेही प्रतिक्रिया दिली आहे.  शाहरुख खानचे उत्तर सोशल मीडियावरचांगलेच व्हायरल होत आहे.

 रविवारी एका चाहत्याने ट्विटरवर #AskSRK मध्ये छोट्या मुलीचा व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये एक व्यक्ती मुलाला विचारते, "अहाना, कोणता सिनेमा पाहून आलीस?" तिने उत्तर दिले, पठाण. त्यावर ती व्यक्ती पुढे विचारते, "तुला आवडले का?" चिमुकली उत्तर देते, "नाही." आणि व्हिडिओच्या शेवटी, ती व्यक्ती आणि चिमुरडी हसत आहेत. या व्हिडिओचे कॅप्शन लिहिले आहे, "@iamsrk Ooops."

या ट्विटला उत्तर देताना शाहरुखने लिहिले, "ओह ओह!! आता अजून मेहनत करावी लागेल, ड्रॉइंग बोर्डकडे परत जा.  छोट्या प्रेक्षकांना नाराज करून चालणार नाही. "कृपया तिला DDLJ म्हणजेच दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे सुद्धा दाखवा... कदाचित तिला रोमँटिक सिनेमा आवडत असले... कारण मुलांना काय आवडते हे तुम्हाला कधीच माहीत नसते!” दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे हा शाहरुख खानच्या हिट चित्रपटांपैकी एक आहे. 

शाहरुखच्या चाहत्यांनी कमेंट सेक्शनमध्ये प्रेमाचा वर्षाव केला. बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानने 'पठाण' या चित्रपटातून कमबॅक केले आहे.  तब्बल 4 वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणाऱ्या शाहरुखने 'पठाण' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरील जुने रेकॉर्ड मोडले आहेत. भारतात 400 कोटींचे निव्वळ कलेक्शन आणि जगभरात 750 कोटी कमाई असलेला 'पठाण' हा शाहरुखच्या कारकिर्दीतील केवळ सर्वात मोठा चित्रपट नाही, तर तो 11 दिवसांत बॉलिवूडचा सर्वात मोठा चित्रपट बनला आहे.

टॅग्स :शाहरुख खानपठाण सिनेमा