बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खानच्या बिग बजेट 'किंग' सिनेमाची चाहत्यांना उत्सुकता आहे. सिनेमाची घोषणा झाल्यापासूनच शाहरुखच्या या चित्रपटाच्या प्रेक्षक प्रतिक्षेत आहेत. काही महिन्यांपूर्वी 'किंग' सिनेमातील शाहरुखचा फर्स्ट लूक समोर आला होता. आता सिनेमाचा नवा टीझर प्रदर्शित करण्यात आला असून रिलीज डेटही समोर आली आहे. शाहरुखचा 'किंग' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे आता चाहत्यांना शाहरुखच्या या सिनेमासाठी फार वाट पाहावी लागणार नाही. कारण, याच वर्षी सिनेमा प्रदर्शित होणार आहे.
'किंग' सिनेमाच्या नव्या टीझरमध्ये शाहरुखचा नवा अवतार पाहायला मिळत आहे. टीझरच्या सुरुवातीला बर्फाचा हिमालय दिसत असून शाहरुख उभा असल्याचं दिसत आहे. काही अॅक्शन सीन्सही या टीझरमध्ये पाहायला मिळत आहेत. डर नही दहशत हूँ असा दमदार डायलॉगही शाहरुखच्या तोंडी या टीझरमध्ये आहे. हा टीझर पाहून सिनेमाबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. यावर कमेंट करत चाहत्यांनी शाहरुखचं कौतुक केलं आहे.
'किंग' सिनेमा या वर्षाच्या शेवटी प्रदर्शित केला जाणार आहे. २४ डिसेंबर २०२६ रोजी शाहरुखचा 'किंग' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिद्धार्थ आनंदने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. 'किंग' सिनेमामध्ये शाहरुखची लेक सुहाना खानही दिसणार आहे. या सिनेमात बापलेकीची जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
Web Summary : Shah Rukh Khan's 'King' teaser unveils his new avatar, featuring action scenes and a powerful dialogue. The film, directed by Siddharth Anand, stars Suhana Khan alongside SRK. It's set to release on December 24, 2026.
Web Summary : शाहरुख खान की 'किंग' का टीजर जारी, जिसमें उनका नया अवतार, एक्शन सीन और एक दमदार डायलॉग है। सिद्धार्थ आनंद द्वारा निर्देशित फिल्म में सुहाना खान भी हैं। यह 24 दिसंबर, 2026 को रिलीज होने वाली है।