Join us

शाहरूख खानने व्यक्त केली ही खंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2018 18:13 IST

बॉलिवूडचा किंग खान शाहरूखचा आगामी चित्रपट 'झिरो'चा ट्रेलर नुकताच कोलकाता आतंरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दाखवण्यात आला.

ठळक मुद्देमी आजपर्यंत ७० चित्रपट केले आहेत - शाहरूख खानअद्याप एकही राष्ट्रीय पुरस्कार मिळाला नाही - शाहरूख खान

बॉलिवूडचा किंग खान शाहरूखचा आगामी चित्रपट 'झिरो'चा ट्रेलर नुकताच कोलकाता आतंरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दाखवण्यात आला आणि महोत्सवाच्या आयोजकांनी शाहरुखला क्रिस्टर ट्रॉफी देऊन त्याचा सत्कार केला. यावेळी शाहरूखने आतापर्यंत त्याला एकही राष्ट्रीय पुरस्कार मिळाला नाही आणि त्याच्या एकाही सिनेमाचे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात स्क्रीनिंग न झाल्याची खंत व्यक्त केली. 

यावेळी शाहरूख खान म्हणाला की, ''मी आजपर्यंत ७० चित्रपट केले आहेत, परंतु मला चित्रपट महोत्सवात नाचण्यासाठी किंवा प्रतिनिधींचे स्वागत करण्यासाठी आणि लोकांसमोर चांगले दाखवण्यासाठी बोलवले जाते आणि बौद्धिक कामासाठी मला कधीच बोलवले जात नाही. याचे कारण हे आहे की मी बुद्धिमान आणि अति हुशारदेखील नाही.'' शाहरुख पुढे म्हणाला, ''मला कधीही राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला नाही ही गोष्ट दुर्भाग्याची आहे.'' दिग्दर्शक आनंद एल. राय आणि शाहरूख 'झिरो' चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच सोबत काम करत आहेत. या चित्रपटात शाहरूख सोबत कतरिना कैफ आणि अनुष्का शर्मा या देखील झळकणार आहेत. २१ डिसेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात शाहरूख खान एका बुटक्या व्यक्तिच्या भूमिकेत आहे. या चित्रपटात अनुष्का एका महिला शास्त्रज्ञाच्या तर कॅटरिना एका व्यसनी अभिनेत्रीची भूमिका वठवणार आहेत. केवळ इतकेच नाही तर काजोल, राणी मुखर्जी, करिश्मा कपूर, दीपिका पादुकोण आणि आलिया भट्ट या सुद्धा या चित्रपटात दिसणार आहेत. एका गाण्यात सलमान आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीही झळकणार आहेत. श्रीदेवींनी मृत्यूपूर्वी आपल्या वाट्याचे सीन शूट केले होते. त्याअथार्ने ‘झिरो’ हा श्रीदेवींचा अखेरचा चित्रपट ठरणार आहे.  

टॅग्स :शाहरुख खानझिरो सिनेमा