Join us

आसामात बंगाली गाणे गायल्यामुळे शानवर संतापले लोक, भिरकावला पेपर बॉल!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2018 13:06 IST

आसामातील एका कॉन्सर्टमध्ये बंगाली गाणे गायल्यामुळे गायक शानला आसामी लोकांच्या संतापाचा सामना करावा लागला.

आसामातील एका कॉन्सर्टमध्ये बंगाली गाणे गायल्यामुळे गायक शानला आसामी लोकांच्या संतापाचा सामना करावा लागला. होय, गुवाहाटीच्या सरूसजाई स्टेडियममध्ये एका कॉन्सर्टचे आयोजन करण्यात आले होते. या कॉन्सर्टमध्ये शानने एकापेक्षा एक धम्माल गाणी गायलीत. पण यानंतर शानने एक बंगाली गाणे गायला सुरूवात करताच, समोर जमलेल्या गर्दीतील कुणीतरी त्याच्या दिशेने पेपर बॉल भिरकावला. या प्रकारामुळे शान प्रचंड संतापला.‘पेपर बॉल फेकणाºयास स्टेजवर आणा. तु जो कुणी आहेत, कधीच कलाकारांवर वस्तू भिरकावू नकोस. एका कलाकाराचा आदर करायला शिक, असे यानंतर शान म्हणताना दिसला. मला ताप होता. मी औषधं घेऊन स्टेजवर आलोय. रात्रभर तुमच्यासमोर गाणार आहे. तुम्ही हा असला प्रकार करणार असाल, असे वागणार असाल तर मला गाण्यात काहीही रस नाही, असेही तो म्हणाला. सोशल मीडियावरही या घटनेचे पडसाद उमटलेत. प्राप्त माहितीनुसार, शान बंगाली गाणे गात असलेला पाहून गर्दीतील लोक भडकले. आसाममध्ये येऊन बंगाली गाणे गाणे गर्दीला आवडले नाही. यापैकी काही लोकांनी सोशल मीडियावर शानची माफी मागितली. अर्थात काहींनी आसामच्या भूमीवर बंगाली गाणे गायल्याबद्दल शानला फैलावरही घेतले. याबद्दल काहींनी शानला परखड सवाल केले. यापैकी काही प्रश्नांना शानने उत्तरे  दिली आहेत. एका अशाच प्रश्नाचे उत्तर देताना शान म्हणाला की, मी त्या केवळ एका व्यक्तिवर संतापलो नाही. तर  फुट पाडू पाहणाºया आणि या फुटीच्या राजकारणात वाहावत जाणाºया सगळ्यांवर संतापलो आहे. युवकांनी या जाळ्यात फसता कामा नसे.शानने बॉलिवूडमध्ये अनेक सुपरहिट गाणी गायली आहेत. प्यार में कभी कभी, फना, कभी अलविदा ना कहना, मस्ती, वेलकम, तारे जमीं पर अशा अनेक चित्रपटांसाठी तो गायला आहे.याशिवाय अनेक रिअ‍ॅलिटी शोमध्ये जज म्हणूनही तो दिसला आहे 

टॅग्स :शान