Join us
Daily Top 2Weekly Top 5

'पापा बाय चांस' मालिकेची जागा घेणार ही मालिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2018 07:15 IST

स्टार भारत वाहिनीवरील मालिका 'पापा बाय चांस' लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

ठळक मुद्दे'कालभैरव रहस्य' मालिकेचा दुसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला'कालभैरव रहस्य २'मध्ये गौतम रोडे व अदिती गुप्ता मुख्य भूमिकेत

पूर्वी मालिका बरेच वर्षे चालायच्या मात्र आता हा ट्रेंड गेला. हल्ली भारतीय मालिका तीन महिन्यात बंद होतात. त्यातील काही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडल्या नाही तर त्या मालिकांना लवकर गाशा गुंडाळवा लागतो. स्टार भारत वाहिनीवरील मालिका 'पापा बाय चांस' लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेची जागी प्रेक्षकांना 'कालभैरव रहस्य' मालिकेचा दुसरा सीझन पाहायला मिळणार आहे.

'कालभैरव रहस्य' मालिकेचा दुसरा सीझन लवकर स्टार भारत वाहिनीवर दाखल होणार आहे. पापा बाय चांस मालिकेच्या जागी ही मालिका संध्याकाळी सात वाजता प्रसारीत होणार आहे. 'कालभैरव रहस्य' मालिकेला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर निर्मात्यांनी दुसरा सीझन बनवण्याचा निर्णय घेतला असून मालिकेतील कलाकारांच्या निवड प्रक्रियेला सुरूवात केली आहे. पहिल्या भागात छवी पांडे, राहुल शर्मा व सरगुन कौर प्रमुख भूमिकेत होते.'कालभैरव रहस्य'च्या दुसऱ्या सीझनमध्ये मुख्य भूमिकेत गौतम रोडे व अदिती गुप्ता दिसणार आहे. यांच्याव्यतिरिक्त या मालिकेत सिद्धांत कर्णिक, सोनिया सिंग व आयाम मेहता प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. ही मालिका एका मंदिरातील रहस्यावर आधारीत असणार आहे आणि यावेळेस मालिकेत बंगला व त्यात राहणारे कुटुंब आणि त्यांच्या जवळच्या मंदिरावर आधारीत असणार आहे. ही मालिका २७ नोव्हेंबरला रसिकांच्या भेटीला येणार आहे. 'कालभैरव रहस्य' मालिकेच्या दुसऱ्या सीझनची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहत आहेत. 

टॅग्स :काल भैरव रहस्य २