Join us
Daily Top 2Weekly Top 5

सनाया इराणीची ही मालिका आहे आवडती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2018 06:30 IST

रूपसुंदर सनाया इराणी हिने साकारलेल्या उत्साही आणि आनंदी स्वभावाच्या खुशीने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली होती.

स्टार प्लस’वरील ‘इस प्यार को क्या नाम दूँ!’ या मालिकेतील खुशी या व्यक्तिरेखेचे नाव घेतले की आजही प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू फुलते. रूपसुंदर सनाया इराणी हिने साकारलेल्या उत्साही आणि आनंदी स्वभावाच्या खुशीने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली होती. अलीकडेच ‘स्टार परिवार पुरस्कार 2018 सोहळ्या’त सनायाने आपल्या या आजवरच्या सर्वात लोकप्रिय व्यक्तिरेखेच्या स्मृती जागवल्या होत्या.

या सोहळ्यात सनाया म्हणाली, “‘इस प्यार को क्या नाम दूँ!’ ही मालिका आजही माझी सर्वात आवडती मालिका असून त्यात मला खुशीची व्यक्तिरेखा साकारायला मिळाली, हे मी माझं सुदैव मानते. मला खुशी फार आवडते आणि ती माझी सर्वात आवडती व्यक्तिरेखा राहील. ती स्वभावाने लाघवी, स्वच्छंदी तरीही कणखर होती आणि तिने मोठेपणातही एक बालिश निरागसता अतिशय सुंदरतेने साकारली होती. चाहत्यांकडून आजही तिच्यावर प्रेमाचा वर्षाव होत असतो, हे पाहून मी भारावून गेले आहे. चाहत्यांनी खुशीला आजही जिवंत ठेवली आहे. खुशीची व्यक्तिरेखा रंगवीत असताना मला चाहत्यांचं आणि प्रेक्षकांचं जे उदंड प्रेम मिळालं होतं, त्याचं वर्णन शब्दांत करता येणार नाही. आजही मी माझा सोशल  मीडियाचा अकाउंट उघडते, तेव्हा त्यावर खुशीसाठी शेकडो संदेश आलेले असतात, हे पाहून माझं मन भरून जातं. मला खुशीची आणि त्या मालिकेतल्या सर्व कलाकार आणि कर्मचाऱ्यांची फार आठवण आजही येत असते. स्टार प्लस परिवाराची मी एक सदस्य आहे, हा मी माझा बहुमान समजते आणि स्टार परिवार पुरस्कार सोहळ्यात मला सहभागी होता आलं, याचा मला अतिशय आनंद वाटतो.” 

टॅग्स :सनाया ईरानीस्टार प्लस