Join us
Daily Top 2Weekly Top 5

नसिरुद्दीन शाह या खास व्यक्तीकडून घेत आहेत मराठीचे धडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2018 10:39 IST

अनेक दिग्गज बॉलीवूड कलाकारांना मराठी सिनेमा आकर्षित करत आहे. अक्षय कुमार, प्रियांका चोप्रा यासारखे कलाकार मराठी सिनेमा निर्मिती क्षेत्रात उतरले आहेत.

हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांना मराठी प्रेमाचं भरतं आले आहे.अनेक दिग्गज बॉलीवूड कलाकारांना मराठी सिनेमा आकर्षित करत आहे. अक्षय कुमार, प्रियांका चोप्रा यासारखे कलाकार मराठी सिनेमा निर्मिती क्षेत्रात उतरले आहेत. आमिर खाननेसुद्धा वेळोवेळी त्याचा मराठी बाणा दाखवला आहे. मराठी सिनेमांचे हिंदी रिमेक तयार होत आहेत. काही कलाकार मराठी सिनेमात कामही करत आहेत.अशाच कलाकारांपैकी एक म्हणजे प्रसिद्ध आणि ज्येष्ठ अभिनेता नसिरुद्दीन शाह. मराठी कलाकार, मराठी थिएटर आणि सिनेमाबाबत वारंवार प्रेम व्यक्त करणाऱ्या नसिरसाहेबांनी २०११ साली उमेश कुलकर्णी दिग्दर्शित 'देऊळ' सिनेमातून मराठी रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं. या सिनेमात त्यांनी साकारलेली छोटीशी भूमिका लक्षवेधी ठरली. यानंतर त्यांनी काही दिवसांपूर्वी रुपेरी पडद्यावर रिलीज झालेल्या 'न्यूड' सिनेमातही भूमिका साकारली होती. यांतही नसिरसाहेबांची छोटी भूमिका होती. मात्र मराठी मोठ्या किंवा प्रमुख भूमिकेत ते अद्याप झळकलेले नाहीत. त्याचं कारणही नसिरसाहेबांकडे आहे. जोवर अस्खलित मराठी बोलता येणार नाही तोवर मोठी भूमिका साकारणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे. मराठी बोलता यावं यासाठी नसिरसाहेब तितकीच मेहनत घेत आहेत. मराठी भाषा शिकण्याचा आणि ती लवकरात लवकर आत्मसात करण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती मिळत आहे. यासाठी त्यांना एक खास व्यक्ती मदत करत आहे. हीच व्यक्ती त्यांची मराठीची गुरु आहे. ही व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नसून नसिरसाहेबांची पत्नी आणि अभिनेत्री रत्ना पाठक या आहे. नसिरसाहेबांसाठी त्यांची पत्नी त्यांच्यासाठी मराठीची गुरु आहे. रत्ना यांच्याकडूनच ते मराठीचे धडे घेत आहेत. त्यामुळे नसिरसाहेबांनी लवकरात लवकर मराठी शिकून मोठी भूमिका मराठी सिनेमात साकारावी अशी त्यांच्या फॅन्सची इच्छा असेल.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

टॅग्स :नसिरुद्दीन शाह