Join us

बिग बॉस फेम असीम रियाझसोबत म्युझिक व्हिडिओमध्ये झळकणार सेहनूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2020 20:38 IST

गायिका, निर्माती आणि अभिनेत्री असा प्रवास करणारी सेहनूर आता बिग बॉस फेम असीम रियाझसोबत म्युझिक व्हिडिओमध्ये झळकणार आहे.

गायिका, निर्माती आणि अभिनेत्री असा प्रवास करणारी सेहनूर आता बिग बॉस फेम असीम रियाझसोबत म्युझिक व्हिडिओमध्ये झळकणार आहे. हल्लीच ती झी म्युझिकच्या गर्लफ्रेंड गाण्यात ती झळकली होती. तिच्या या गाण्याला सोशल मीडियावर खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता ती असीम रियाझसोबतच्या म्युझिक व्हिडिओबाबत खूप उत्सुक आहे.

सेहनूर हिने नुकतेच सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिच्या म्युझिक व्हिडिओबद्दल सांगितले आहे. तसेच तिने या गाण्यातील तिचा लूक रिव्हील केला आहे. याशिवाय असिम रियाझने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून त्याच्या आगामी गाण्याची माहितीही दिली आहे आणि सेहनूरला टॅग केले आहे.

असिम आणि सेहनूरचे चाहते त्या दोघांचे हे गाणे पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत. 

सेहनूरचे आगामी गाणे स्टेबिन बेन गाणार आहे. याखेरीज हे सारेगामा बॅनरखाली येणार आहे. हा म्युझिक व्हिडिओ लवकरच रिलीज होणार आहे. ज्याची तिचे चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत. 

टॅग्स :बिग बॉसआसिम रियाज