Join us
Daily Top 2Weekly Top 5

Salim Khan: सलमान खानचे वडील सलीम खान यांची प्रकृती बिघडली; लीलावती रुग्णालयामध्ये उपचार सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 14:12 IST

Salim Khan Hospitalised: बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानचे वडील आणि दिग्गज पटकथा लेखक सलीम खान यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना मुंबईतील वांद्रे येथील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Salim Khan Health Update:बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानचे वडील आणि दिग्गज पटकथा लेखक सलीम खान यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना मुंबईतील वांद्रे येथील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सलीम खान ९० वर्षांचे असून ब्रेन स्ट्रोक झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. त्यांच्यावर सध्या ICU मध्ये उपचार सुरु आहेत

PTI ने दिलेल्या माहितीनुसार, सलीम खान यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी तातडीने त्यांना रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेतला. सध्या डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत आहेत. दरम्यान लीलावती हॉस्पिटलबाहेर सलमान खान आणि सलीम खान यांचा जावई अभिनेता आयुष शर्मा यांना स्पॉट करण्यात आले आहे. सलीम खान या आजारपणातून लवकर बरे होतील अशी चाहत्यांना आशा आहे. 

चित्रपटसृष्टीतील योगदान

सलीम खान यांनी भारतीय चित्रपटसृष्टीला 'शोले', 'जंजीर', 'दीवार' आणि 'डॉन' सारखे अविस्मरणीय चित्रपट दिले आहेत. जावेद अख्तर यांच्यासोबतची त्यांची 'सलीम-जावेद' ही जोडी बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी जोडी मानली जाते. सलमान खान आणि कुटुंबीय सलीम खान यांच्या प्रकृतीबद्दल अधिक माहिती लवकरच शेअर करतील, अशी चाहत्यांना आशा आहे. सलीम खान यांचा मित्रपरिवार आणि कुटुंबातील सदस्य त्यांच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी लीलावती रुग्णालयात हजेरी लावत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Salim Khan, Salman Khan's father, hospitalized due to health issues.

Web Summary : Veteran writer Salim Khan, 90, was admitted to Lilavati Hospital in Mumbai due to illness. He is currently in the ICU. Salman Khan and Ayush Sharma were spotted at the hospital. Fans hope for his speedy recovery.
टॅग्स :सलीम खानसलमान खानहॉस्पिटलबॉलिवूड