Join us
Daily Top 2Weekly Top 5

'बधाई दो'चं एक शेड्यूल झाले पूर्ण, राजकुमार राव आणि भूमी पेडणेकरने केली पावरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2021 17:36 IST

अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री भूमी पेडणेकर यांचा आगामी चित्रपट 'बधाई दो' या चित्रपटाचे एक शेड्यूल पूर्ण केले आहे.

अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री भूमी पेडणेकर यांचा आगामी चित्रपट 'बधाई दो' या चित्रपटाने एक शेड्यूल पूर्ण केले आहे. या निमित्ताने सेलिब्रेशन म्हणून दिग्दर्शक आणि क्रू सोबत राजकुमार राव आणि भूमि पेडणेकर देखील पावरी ट्रेंड मध्ये सहभागी झाले आहेत.  

‘बधाई दो’ २०१८ चा नॅशनल अवॉर्ड विनिंग चित्रपट 'बधाई हो' ची फ्रेंचाइज़ी असून यामध्ये आयुषमान खुराना मुख्य भूमिकेत दिसला होता आणि हा चित्रपट प्रेक्षक आणि समीक्षकांनी उचलून धरला होता. त्यानंतर आता या चित्रपटाचा सीक्वल येत असून त्याचे नाव बधाई दो असे आहे. या चित्रपटाचे एक शेड्युल पूर्ण झाल्याच्या निमित्ताने जंगली पिक्चर्सने आपल्या सोशल मीडिया हैंडलवरून एक क्वर्की वीडियो शेयर केला होता त्यामध्ये टीमच्या मॅडनेस व्हिडीओ शेअर केला होता, जो सोशल मिडीयावर चर्चेत आला आहे. यात लिहिले आहे की, ये हमारी टीम है, ये इनकी मॅडनेस है, और ये हमारी शेड्युल व्रॅप की पावरी हो रही है. बधाई दो. पावरी हो रही है.

भूमिने देखील आपल्या सोशल मीडियावर शेड्यूल रॅपअप बद्दल पोस्ट करताना लिहिले," आज रात्रीची पावरी कुठे आहे? बधाई दोच्या सेट्सवर. शेड्युल व्रॅफ झाले आहे. बधाईयां तो बनती है ना फिर. पावरी हो रही है.

यावर राजकुमारने देखील आपल्या सोशल मीडियावर टीमसोबतचा #Pawri सीन शेअर केला आणि त्यावर लिहिले,"पावरी तो... पावरी तो... पावरी तो बनती है कारण उत्तराखंडचे शेड्युल पूर्ण झाले आहे.

बधाई दो सिनेमाच्या निमित्ताने राजकुमार पहिल्यांदाच पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे आणि या लुकसाठी त्याने खास मिशा वाढवल्या आहेत आणि तसे आपले फिजीक देखील बनवले आहे, आणि भूमि एका पीटी शिक्षिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. जवळपास दोन महिने मसूरी आणि देहरादूनमध्ये याचे शूटिंग सुरु होते.  हर्षवर्धन कुलकर्णी दिग्दर्शित आणि अक्षत घिल्डियाल व सुमन अधिकारी द्वारा लिखित 'बधाई दो' जंगली पिक्चर्स द्वारा निर्मित आहे.

टॅग्स :बधाई होराजकुमार रावभूमी पेडणेकर