Join us
Daily Top 2Weekly Top 5

रिस्क है तो इश्क है...! ‘स्कॅम 1992’ची अभिनेत्री अंजली बरोटने बांधली गौरवसोबत साताजन्माची गाठ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2021 13:13 IST

‘स्कॅम 1992 - द हर्षद मेहता’ मधील ‘रिस्क है तो इश्क है’ हा अंजलीच्या तोंडचा डायलॉग खूप गाजला होता.

ठळक मुद्दे6 डिसेंबर 1993 रोजी जन्मलेली अंजली मुळची मुंबईची आहे. तिचे वडील योगेश बरोट पेशाने बिझनेसमॅन आहेत तर आई गृहिणी आहे.

‘स्कॅम 1992 - द हर्षद मेहता’ ही नेटफ्लिक्सवरची वेबसीरिज किती गाजली, किती लोकप्रिय ठरली हे नव्याने सांगायची गरज नाही. टॉप 10 भारतीय वेबसीरिजमध्ये या सीरिजने बाजी मारली होती. तूर्तास या वेबसीरिजची अभिनेत्री अंजली बरोट चर्चेत आहे. होय, अंजलीने बॉयफ्रेन्ड गौरव अरोरासोबत लग्नगाठ बांधली आहे. या लग्नाचे काही सुंदर फोटो सध्या व्हायरल झाले आहेत.

अंजलीने ‘स्कॅम 1992 - द हर्षद मेहता’ या वेबसीरिजमध्ये हर्षद मेहताची पत्नी ज्योती मेहताची भूमिका साकारली होती.

अंजली दीर्घकाळापासून गौरवसोबत रिलेशनशिपमध्ये होती. 16 फेबु्रवारीला तिचा व गौरवचा शाही लग्नसोहळा पार पडला. लग्नात अंजलीने ट्रॅडिशनल रेड लहंगा घातला होता.

लग्नाचे काही फोटो अंजलीने शेअर केले आहेत. अगदी मेहंदीपासून सप्तपदीपर्यंतचे अनेक फोटो यात आहेत.

‘स्कॅम 1992 - द हर्षद मेहता’ मधील ‘रिस्क है तो इश्क है’ हा अंजलीच्या तोंडचा डायलॉग खूप गाजला होता. 6 डिसेंबर 1993 रोजी जन्मलेली अंजली मुळची मुंबईची आहे. तिचे वडील योगेश बरोट पेशाने बिझनेसमॅन आहेत तर आई गृहिणी आहे. अंजलीचे एक युट्यूब चॅनलही आहे. ज्याचे लाखो सब्सक्राइबर्स आहेत.

टॅग्स :स्कॅम १९९२