Join us

सयाजी शिंदे यांच्या पत्नीने शेअर केला दोघांचा फोटो, पत्नी दिसते खूप सुंदर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2022 07:00 IST

सयाजी शिंदे (Sayaji Shinde) यांची पत्नी आणि मुले लाइमलाईटपासून दूर राहणे पसंत करतात.

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे (Sayaji Shinde) यांनी मराठीच नाही तर तेलगू, तमिळ, कन्नड, मल्याळम, इंग्रजी, गुजराती आणि हिंदी भाषिक चित्रपटात काम केले आहे. सयाजी शिंदे यांनी अभिनय कौशल्याच्या जोरावर मराठी, हिंदी आणि दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीत आपले स्थान निर्माण केले आहे. याशिवाय ते सामाजिक कार्यातही सहभागी होताना दिसतात. त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल फार कमी लोकांना माहित आहे. त्यांच्या पत्नी आणि मुले लाइमलाईटपासून दूर राहतात. त्यांच्या पत्नीचे नाव अलका शिंदे असून ती खूप सुंदर दिसते.

सयाजी शिंदे यांच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचे तर त्यांच्या पत्नीचे नाव अलका शिंदे असून त्यांना सिद्धार्थ नावाचा एक मुलगा आहे. त्यांची पत्नी आणि मुलगा लाइम लाईटपासून दूर राहतात. मात्र त्यांचे सोशल मीडियावर फोटो पहायला मिळतात.

सयाजी शिंदे यांनी १९७८ साली मराठी एकांकिकेतून अभिनय कारकीर्दीची सुरूवात केली. १९८७ मध्ये झुल्वा नावाच्या मराठी नाटकातील त्यांचा अभिनय चांगलाच हिट ठरला आणि तेव्हापासून त्यांना खूप लोकप्रियता मिळू लागली. त्यानंतर त्यांनी इतर प्रादेशिक भाषांमध्येही अभिनय करण्यास सुरुवात केली.

१९९५ साली अबोली या मराठी चित्रपटातून सयाजी शिंदे यांनी मराठी सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केले. तसेच त्यांनी बऱ्याच मराठी नाटकात काम केले आहे. त्यापैकी सखाराम बाईंडर यांच्या भूमिकेची खूप प्रशंसा झाली होती. झुल्वा, वन रूम किचन आणि आमच्या या घरात ही नाटके खूप लोकप्रिय ठरली. त्यानंतर त्यांनी बर्‍याच मराठी चित्रपटांमध्ये काम केले. त्यापैकी गोष्ट छोटी डोंगरा एवढी या चित्रपटात कृषीमंत्री म्हणून केलेली त्यांची भूमिका सर्वांच्या लक्षात राहिली. सयाजी शिंदे यांनी बऱ्याच हिंदी आणि साउथच्या चित्रपटात काम केले आहे.

टॅग्स :सयाजी शिंदे