मुंबई : सध्याचे जग हे इंटरनेटचे आहे. एक काळ असा होता की, संगणक दिसायचे नाहीत. पण आता प्रत्येकाच्या हातामध्ये संगणकरुपी मोबाईल आला आहे. प्रत्येक दिवसाला अनलिमिटेड इंटरनेट तुम्हाला वापरायला मिळते. त्यामुळे कोणतेही अॅप तुम्ही सहजपणे डाऊनलोड करू शकता. हे अॅप आवडले नाही किंवा गरज नसेल तर डिलीटही करू शकता आणि जेव्हा गरज लागेल तेव्हा पुन्हा डाऊनलोड करू शकता. अॅप डाऊनलोड करताना काही प्रश्न विचारले जातात आणि सवयीप्रमाणे आपण 'आय अॅग्री'वर क्लिक करतो. आपण 'आय अॅग्री'वर क्लिक करण्यात एवढे सरावलो असतो की, दुसरा ऑप्शन आहे की नाही हेच पाहत नाही. पण हेच 'आय अॅग्री' किती महागात पडू शकतं, हे सांगणारी ही पुण्याच्या 'आमचे आम्ही' या संस्थेची एकांकिका होती.एकांकिकेचं लिखाण साध, सरळ, लोकांना भावेल असं होतं. त्याचबरोबर चांगले धक्कातंत्रही वापरण्यात आले होते. तंत्रज्ञान तुमचे आयुष्य कसे उधळून लावू शकते. तुम्ही तंत्रज्ञानाच्या आहारी जाऊन बुद्धी कशी गहाण ठेवता, याचा उत्तम वस्तुपाठ या एकांकिकेमधून दाखवण्यात आला होता.
सवाई एकांकिका : 'आय अॅग्री' म्हणत होतोय तुमचा घात...
By प्रसाद लाड | Updated: January 30, 2019 17:30 IST