Join us

टीव्हीवर गाजवला 'श्रीकृष्ण' आता 'शिवराय' साकारणार अभिनेता, 'वीर मुरारबाजी' हिंदी सिनेमात मराठी कलाकारांची फौज

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 13:40 IST

श्रीकृष्णाची भूमिका गाजवलेला अभिनेता सौरभ जैन छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. शिवजयंती निमित्त त्याचा सिनेमातील लूक प्रदर्शित करण्यात आला आहे.

विकी कौशलच्या छावा सिनेमाची सर्वत्र चर्चा सुरू असतानाच आता शिवजयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराजांवरील नव्या सिनेमांची घोषणा होत आहे. काही दिवसांपूर्वीच वीर मुरारबाजी या सिनेमाची घोषणा करण्यात आली होती. शिवाजी महाराजांच्या शूर मावळ्यांपैकी एक असलेले रणधुरंधर नरवीर मुरारबाजी देशपांडे यांच्या शौर्याची गाथा या सिनेमातून मोठ्या पडद्यावर मांडण्यात येणार आहे. या सिनेमात श्रीकृष्णाची भूमिका गाजवलेला अभिनेता सौरभ जैन छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. शिवजयंती निमित्त त्याचा सिनेमातील लूक प्रदर्शित करण्यात आला आहे. 

'वीर मुरारबाजी' सिनेमातून पुरंदरच्या लढाईत ‘न भूतो न भविष्यती’ असा पराक्रम गाजवणाऱ्या शूरवीर मुरारबाजी देशपांडे यांची यशोगाथा भव्यदिव्य स्वरूपात रुपेरी पडद्यावर मांडण्यात येणार आहे. या सिनेमात अभिनेता अंकित मोहन मुख्य भूमिकेत असून तो शूरवीर मुरारबाजी देशपांडे यांची भूमिका साकारणार आहे. आलमंड्स क्रिएशन्स व ए.ए.फिल्म्स यांची निर्मिती असलेला हा सिनेमा लवकरच सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. 

'वीर मुरारबाजी' सिनेमाची स्टारकास्ट समोर आली आहे. या हिंदी सिनेमात मराठी कलाकारांची फौज दिसणार आहे. संतोष जुवेकर, प्राजक्ता गायकवाड, रमेश परदेशी, समीर देशपांडे हे कलाकार दिसणार आहेत. तर तनिषा मुखर्जी, दिपिका चिखलिया आणि अरुण गोविल यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. 

टॅग्स :छत्रपती शिवाजी महाराजअंकित मोहनसंतोष जुवेकरप्राजक्ता गायकवाड