Join us
Daily Top 2Weekly Top 5

सौम्या टंडनचा घुमर डान्स पाहिला का? दिसली दीपिका पादुकोण पेक्षाही सुंदर, एकदा पाहाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2021 19:55 IST

सौम्याने अनेक मालिकांमध्ये काम केले असले तरी तिला भाभीजी घर पर है या मालिकेमुळे खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली होती.

सौम्या टंडनला यापूर्वी कोणीच पाहिले नसेल अशा अंदाजात ती चाहत्यांच्या समोर आली आहे. सोशल मीडियावर सक्रीय असणारी सौम्या टंडन नेहमीच चाहत्यांसह तिचे ग्लॅमरस फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. सोशल मीडियावरील तिच्या नव्या व्हिडिओने रसिकांना अक्षरशा वेड लावलं आहे चाहत्यांसाठीच तिने एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये ती घुमर डान्स करताना पाहायला मिळत आहे. 

या व्हिडिओमध्ये घुमार गाण्यावर थिरकणाऱ्या सौम्याच्या अदांचा जलवा पाहायला मिळत आहे.तिने पारंपरिक घागरा चोली परिधान केली असून त्यावर विशेष अशी राजस्थानी कलाकुसरही पाहायला मिळत आहे. तिचा मेकअप राजस्थानी पारंपरिक लूक असून तिच्या सौंदर्यांला चारचाँद लावत असल्याचं दिसत आहे.

सौम्याच्या डान्स स्टेप्स आणि तिचे हावभाव चित्रपटसृष्टीतील दिग्गज डान्सर्सनाही लाजवतील असेच आहेत. व्हिडीओ शेअर करताच अवघ्या काही तासांतच लाखो व्हुज आणि लाईक्सचा वर्षाव झाल्याचे पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे काही युजर्सने तर दीपिकापेक्षाही भन्नाट डान्स केल्याचे सांगत तिचे कौतुक करताना पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमधून अभिनयाप्रमाणेच तिला डान्सची प्रचंड आवड असल्याचे समोर आले आहे.

सौम्या टंडन आज टीव्हीवरील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. सौम्या टंडनने ऐसा देश है मेरा, मेरी आवाज को मिल गई रोशनी यांसारख्या मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. जब वी मेट या चित्रपटात देखील ती एका महत्त्वाच्या भूमिकेत झळकली होती. सौम्याने अनेक मालिकांमध्ये काम केले असले तरी तिला भाभीजी घर पर है या मालिकेमुळे खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली होती.

मालिका सोडल्यानंतर सौम्या टंडनची अनिता भाभी भूमिका नेहा पेंडसे साकारत आहे. सौम्याने मालिका सोडल्याचे कारण 'बिग बॉस १४' असल्याच्या चर्चा होत्या. मध्ये सहभागी होणार असल्याचे म्हटले जात होते.अखेर तिला सांगावे लागले होते की,  'बिग बॉस'मध्ये माझ्या एन्ट्री संबंधित तर्कवितर्क लावणे आणि यावर लिहिणे थांबवा. मी बिग बॉसच्या घरात एन्ट्री करणार नाहीय. 

टॅग्स :सौम्या टंडन