Join us
Daily Top 2Weekly Top 5

'सारं काही तिच्यासाठी' मालिकेत नवं वळण, उमाची नृत्यकला पाहिल्यावर खोतांच्या घरात येणार वादळ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2023 17:02 IST

उमाला नृत्याची आवड आहे, ही गोष्ट खोत कुटुंबातील कुणालाच माहित नाही.

दुरावलेल्या नात्यांना पुन्हा जवळ आणण्यासाठी उमाने उचललेले पाऊल म्हणजे "सारं काही तिच्यासाठी". ह्या मालिकेत रोज नवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. आता या मालिकेत खोतांच्या घरात नवीन वादळ येताना दिसणार आहे. एकीकडे ओवीच्या येण्याने रघुनाथरावांचा पारा वाढलेला असतानाच, आता निशी आणि उमा देखील खोतांच्या घराचे नियम मोडताना दिसणार आहेत. खोतांच्या घरात ओवीची एन्ट्री झाल्यापासून रोज नवा ड्रामा पाहायला मिळत आहे. 

सांध्याची मुलगी ओवी ही परदेशात राहून देखील तिला उमाबद्दल अनेक गोष्टी ठावूक आहेत. संध्या तिची मुलगी ओवी लहान असल्यापासूनच तिला मावशी उमाच्या गोष्टी सांगायची. उमाला नृत्याची आवड आहे. उमाला नृत्याची आवड आहे, ही गोष्ट खोत कुटुंबातील कुणालाच माहित नाही. उमाने लपवलेली ही कला निशीला कळावी ह्यासाठी ओवी निशीसोबत पैज लावते. पैज लावल्याप्रमाणे ओवी उमाला दिसेल अश्या जागेवर तिचे आवडते घुंगरू ठेवते. ओवीचा हा सगळा प्लॅन यशस्वी ठरतो आणि उमा ते घुंगरू घालून  सुंदर गाण्यावर मंत्रमुग्ध होऊन नृत्य करते. त्याचवेळेस रघुनाथ घरी येतात. आता वीस वर्षानंतर उमाला मिळालेला आनंदाचा क्षण उमाचा घात करेल का ? उमाची नृत्यकला पाहिल्यावर काय करतील रघुनाथ खोत ? 

टॅग्स :झी मराठी