Join us
Daily Top 2Weekly Top 5

सारं काही तिच्यासाठी मालिकेत नवा ट्विस्ट, निशी वडिलांच्या नियमांचं करणार का सीमोल्लंघन?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2023 15:38 IST

ओवीला निशीच्या बॅडमिंटन प्रेमाबद्दल कळतं आणि ती निशाला प्रोत्सहान द्यायचं ठरवते,

दुरावलेल्या नात्यांना पुन्हा जवळ आणण्यासाठी उमाने उचललेले पाऊल म्हणजे "सारं काही तिच्यासाठी". ह्या मालिकेत रोज नवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. एकीकडे ओवीच्या येण्याने रघुनाथरावांचा पारा वाढलेला असतानाच, आता निशी आणि उमा देखील खोतांच्या घराचे नियम मोडताना दिसणार आहेत. खोतांच्या घरात ओवीची एन्ट्री झाल्यापासून रोज नवा ड्रामा पाहायला मिळत आहे. 

आता ह्या मालिकेत आणखी एक मोठा ट्विस्ट येणार आहे. 'सारं काही तिच्यासाठी' ह्या मालिकेत या आठवड्याच्या येत्या भागात प्रेक्षकांना पाहायला मिळेल निशीला बॅडमिंटनच्या स्पर्धेत भाग घ्यायची संधी चालून येते, पण रघुनाथ खोत ह्यांच्या तत्वात ते बसत नाही. वडिलांची जरब असल्यामुळे निशी छायाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करते व मनाविरुद्ध जाऊन स्पर्धेत भाग न घेण्याचे ठरवते.

ओवीला निशीच्या बॅडमिंटन प्रेमाबद्दल कळतं आणि ती निशाला प्रोत्सहान द्यायचं ठरवते आणि स्पर्धेत भाग घ्यायला लावते. त्यामुळे ह्या दसऱ्याच्या मुहूर्तावर निशी सीमोल्लंघन कारणार आहे. आता त्यावर दादा खोतांची प्रतिकिया काय असणार? आणि उमा निशी सोबत उभी राहणार का? ह्या सर्व प्रश्नांच्या उत्तरासाठी पाहायला विसरू नका 'सारं काही तिच्यासाठी' 

टॅग्स :झी मराठी