Join us
Daily Top 2Weekly Top 5

सोहा अली खानची मुलगी इनाया अगदी दिसते तिची बहीण सारासारखी, पाहा हा पुरावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2019 19:00 IST

साराचा एक जुना फोटो तुम्ही पाहिला तर सारा आणि इनायात असलेले साम्य आपल्या लगेचच लक्षात येते.

ठळक मुद्देचिमुकल्या साराला तिचे वडील सैफ अली खानने उचलले असल्याचे आपल्याला पाहायला मिळाले होते. या फोटोतील सारा आणि आताची इनाया अगदी सारखेच दिसतात असेच तुम्ही हा फोटो पाहून म्हणाल.

सोहा अली खानची मुलगी इनाया अतिशय गोंडस दिसत असून तिचे फोटो ती नेहमीच तिच्या सोशल मीडियावर शेअर करत असते. ती क्यूट असल्याचे सोहाच्या सगळ्याच फॅन्सनचे म्हणणे आहे. इनायाला अनेकवेळा तिच्या आई वडिलांसोबत सार्वजनिक ठिकाणी देखील पाहायला मिळते. इनाया ही अभिनेत्री सोहा अली खान आणि अभिनेता कुणाल खेमू यांची मुलगी असून सोशल मीडियावर सध्या तिच्या क्यूटनेसची चांगलीच चर्चा असते. पण तुम्हाला माहीत आहे का, इनाया अगदी तिची बहिण सारा अली खानसारखी दिसते. साराचा एक जुना फोटो तुम्ही पाहिला तर सारा आणि इनायात असलेले साम्य आपल्या लगेचच लक्षात येते.

सारा अली खानला प्रचंड फॅन फॉलोव्हिंग असून ती तिच्या सोशल मीडियावर नेहमीच तिचे फोटो पोस्ट करत असते. तिने काही महिन्यांपूर्वी तिचा एक बालपणीचा फोटो पोस्ट केला होता. या फोटोत चिमुकल्या साराला तिचे वडील सैफ अली खानने उचलले असल्याचे आपल्याला पाहायला मिळाले होते. या फोटोतील सारा आणि आताची इनाया अगदी सारखेच दिसतात असेच तुम्ही हा फोटो पाहून म्हणाल.

सारा अली खान सध्या बॉलिवूडमध्ये एकापेक्षा एक चांगले चित्रपट देत आहे. साराचे वडील सैफ अली खान आणि आई अमृता सिंग हे दोघेही अतिशय प्रसिद्ध अभिनेते आहेत. साराने देखील तिच्या आई वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून काही दिवसांपूर्वी बॉलिवूडमध्ये एंट्री घेतली. तिच्या केदारनाथ या पहिल्याच चित्रपटाला प्रेक्षकांचे चांगलेच प्रेम मिळाले. त्यानंतर सिम्बा या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे देखील कौतुक झाले. लव्ह आज कल 2 आणि कुली नं 1 या चित्रपटांमध्ये ती लवकरच झळकणार असून तिचे फॅन्स तिच्या या चित्रपटांची आतुरतेने वाट पाहात आहेत. सध्या तिच्या चित्रपटांइतकेच तिचे खाजगी आयुष्य देखील चर्चेत आहे. सारा अली खान अभिनेता कार्तिक आर्यनला डेट करत असल्याचे म्हटले जाते. त्या दोघांना अनेकवेळा एकत्र पाहाण्यात येते.   

टॅग्स :सारा अली खानसोहा अली खानसैफ अली खान