Join us
Daily Top 2Weekly Top 5

सारा अली खानला बॉलिवूडच्या ‘या’ दिग्दगर्शकासोबत करायचेय काम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 13:30 IST

दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनी देखील तिच्याकडून उत्कृष्ट अभिनय करून घेतला असे तिचे म्हणणे आहे. मात्र, तिला बॉलिवूडच्या एका दिग्गज दिग्दर्शकासोबत काम करायचे असल्याचे तिने सांगितले.

अभिनेत्री सारा अली खान हिेने तिचे सौंदर्य आणि निरागस हावभावांसह सर्वांना भूरळ घातली आहे. केदारनाथ आणि सिम्बा या दोन चित्रपटांमुळे ती चर्चेत आहे. या दोन्ही चित्रपटांमधील तिच्या अभिनयाचे प्रेक्षक  भरभरून कौतुक करत आहे. दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनी देखील तिच्याकडून उत्कृष्ट अभिनय करून घेतला असे तिचे म्हणणे आहे. मात्र, तिला बॉलिवूडच्या एका दिग्गज दिग्दर्शकासोबत काम करायचे असल्याचे तिने सांगितले. आता तुम्ही म्हणाल कोण आहे हा दिग्दर्शक? तर संजय लीला भन्साळी यांच्यासोबत तिला एका ऐतिहासिक चित्रपटात काम करायचे आहे. 

दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्यासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त करताना सारा म्हणते, ‘मला ऐतिहासिक विषय आवडतात. त्यासोबतच आपल्या देशाचा इतिहास प्रेरणा देणारा आहे. तो चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचतोय याचा मला आनंदच आहे. मलाही अशा चित्रपटांमध्ये काम करायला आवडेल. त्यातच जर भन्साळी यांच्यासोबत जर ती संधी मिळाली तर नक्कीच मजा येईल. अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या.’  

टॅग्स :सारा अली खानसंजय लीला भन्साळीकेदारनाथ