Join us
Daily Top 2Weekly Top 5

भाऊ इब्राहिमसोबत साराचा फोटो पाहून चाहत्यांचा चढला होता पारा, दिल्या होत्या संतप्त प्रतिक्रीया

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2020 13:15 IST

 व्हॅकेशनचे फोटो तिने चाहत्यांसह शेअर केले होते. मात्र यातला एक फोटो नेटक-यांना चांगलाच खटकला आणि या फोटोवर तीव्र प्रतिक्रीया उमटल्या होत्या.

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान बहुधा स्टारकिडसपैकी अशी एक अभिनेत्री आहे जी खूप कमी वेळा नेटक-यांच्या निशाण्यावर येते. ट्रोल करणा-या लिस्टमध्ये सारा अभावानेच पाहायला मिळते. सोशल मीडियावर सक्रिय असणारी सारा प्रत्येक गोष्ट चाहत्यांसह शेअर करते. 5 मार्चला भावाच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी कुटुंबासह मालदीव्हजला गेले होेते.

 व्हॅकेशनचे फोटो तिने चाहत्यांसह शेअर केले होते. मात्र यातला एक फोटो नेटक-यांना चांगलाच खटकला आणि या फोटोवर तीव्र प्रतिक्रीया उमटल्या होत्या. भाऊ इब्राहिम सोबत तिने हा फोटो क्लिक केला होत. यात तिने बिकीनी घातली होती. तसेच फोटोत दिलेली पोजही चाहत्यांना आवडली नाही. भावाबरोबर असे फोटो काढल्याने अनेकांनी संताप व्यक्त केला होता. फोटो दिलेली पोजही अशोभनीय असल्याचे सांगत तिला जबरदस्त ट्रोल केले होते. 

इब्राहिम सध्या शिकतोय. असे असले तरी इब्राहिम सतत चर्चेत असतो. सारा आपल्या आई वडिलांप्रमाणे बॉलिवूडमध्ये आपले प्रस्थ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.पण साराचा भाऊ इब्राहिमला अभिनय या क्षेत्रात रस नाहीये. इब्राहिमला  क्रिकेट खेळण्यात रस आहे. त्याचे आजोबा मन्सूर अली खान पतौडी हे प्रसिद्ध क्रिकेटर होते. इब्राहिमचा क्रिकेट खेळतानाचा एक व्हिडिओ  सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. 

टॅग्स :सारा अली खानइब्राहिम अली खान