Join us
Daily Top 2Weekly Top 5

ड्रग्स प्रकरणी एनसीबीच्या नोटीसमुळे सारा अली खानच्या हातातून निसटला टायगर श्रॉफचा 'हीरोपंती २'?

By गीतांजली | Updated: December 18, 2020 13:09 IST

सुशांत सिंग राजपूत प्रकरणात ड्रग्स अँगल समोर आल्यानंतर एनसीबीने दीपिका पादुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर आणि रकुलप्रीत सिंग यांचीही चौकशी केली.

सुशांतसिंग राजपूत प्रकरणात ड्रग्स अँगल समोर आल्यानंतर नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (एनसीबी बॉलिवूडमध्ये अनेक सेलेब्सची चौकशी केली. याच प्रकरणात एनसीबीने दीपिका पादुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर आणि रकुलप्रीत सिंग यांचीही चौकशी केली. चौकशीत त्याने जे सांगितले ते तरी अद्याप उघडपणे समोर आलेले नाही पण एनसीबीची नोटीस मिळाल्यानंतर सारा अली खानच्या हातातून नक्कीच एक सिनेमा निघून गेल्याचे बोलले जाते आहे.

बॉलिवूडच्या हंगामाच्या रिपोर्टनुसार, सारा अली खानला टायगर श्रॉफच्या अपोझिट 'हिरोपंती 2' कास्ट केले जणार होते, पण आता तिची जागा तारा सुतारियाने घेतली आहे. रिपोर्टनुसार एका सूत्रांनी सांगितले आहे की, सारा अली खानला एनसीबीकडून समन्स मिळताच निर्मात्यांनी तिचे नाव ड्रॉप केलं. सिनेमाच्या निर्मात्यांना भीती आहे की सारामुळे सिनेमा अडचणीत सापडू शकतो. 

यानंतर, या सिनेमात तारा सुतारियाची एंट्री झाली. ताराने याआधीही 'स्टुडंट ऑफ द ईयर 2' सिनेमात टागयर श्रॉफच्या अपोझिट दिसली होती. या सिनेमानंतर तारा आणि टायगरमधील बॉन्डिंगही चांगले आहे. अहमदन खान दिग्दर्शित ‘हीरोपंती 2’च्या शूटिंगला लवकरच सुरुवात होणार आहे. अखेरचा टायगर  'वॉर' सुपरहिट सिनेमात दिसला होता तर तारा सुतारिया 'मरजावां' मध्ये सिद्धार्थ मल्होत्रा ​​सोबत दिसली होती. 

टॅग्स :सारा अली खानतारा सुतारिया